'BMCला नागरिकांच्या 'जीवितहानीचा पुरस्कार द्या', भाजप महिला आमदाराची सणसणीत टीका

'BMCला नागरिकांच्या 'जीवितहानीचा पुरस्कार द्या', भाजप महिला आमदाराची सणसणीत टीका

मुंबईतल्या भानुशाली इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 17 जुलै: मुंबई महापालिकेला नागरिकांच्या 'जीवितहानीचा पुरस्कार' द्या, अशी सणसणीत टीका भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. मुंबईतल्या भानुशाली इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा...सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, CBI ची गरज नाही

मुंबईत 25 वर्षांपासून 400 धोकादायक इमारतीचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेने 25 वर्षात साधं संक्रमण शिबीर उभारलं नाही. महापालिका फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी दिखावा करते. सिडको निर्मित घरांमध्ये राहणाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असंही आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

अन्यथा 8 दिवसानंतर आक्रमक पवित्रा...

आमदार मंदा म्हात्रे यांनी शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. नवी मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत

महापालिकेनं तात्काळ अॅक्शन प्लान तयार करावा, अन्यथा 8 दिवसानंतर आक्रमक पवित्रा घेणार असल्याचा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.

मुंबईत दोन इमारती कोसळून 7 ठार...

मुंबईत पावसाचा कहर सुरूच आहे. मालाडच्या मालवणी व फोर्टमध्ये इमारत कोसळण्याच्या दोन घटनांत 7 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ढिगारा उपसण्याचं काम सुरूच आहे.

हेही वाचा...आता मुंबई पोलिसांसाठी धावला सोनू सूद, 25000 'फेस शिल्ड'ची केली मदत

मालाड पश्चिममधील मालवणी भागात दुपारी अडीचच्या सुमारास तीनमजली चाळीचा भाग कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले आहेत. 15 नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे. तर दक्षिण मुंबईतील फोर्ट भागात सायंकाळी पाच वाजता भानुशाली या 6 मजली इमारतीचा भाग कोसळला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 23 जणांना वाचवण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 17, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या