जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बनावट खातं उघडून 27 कोटींचा गंडा; भावानं बहिणीच्या कमाईवर असा मारला डल्ला

बनावट खातं उघडून 27 कोटींचा गंडा; भावानं बहिणीच्या कमाईवर असा मारला डल्ला

बनावट खातं उघडून 27 कोटींचा गंडा; भावानं बहिणीच्या कमाईवर असा मारला डल्ला

Crime in Yavatmal: बहिणीच्या (Sister) नावानं बनावट खातं उघडून (Fake bank account) भावानं तब्बल 27 कोटी रुपयांचा गंडा ( 27 Crore Fraud) घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 14 जुलै: बहिणीच्या (Sister) नावानं बनावट खातं उघडून (Fake bank account) भावानं तब्बल 27 कोटी रुपयांचा गंडा ( 27 Crore Fraud) घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे भावाच्या (Brother) या कटात बँक मॅनेजर, कर्मचाऱ्यांसह नऊ जण सामील होते. या प्रकरणी बहिणीनं वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी भावासह अन्य साथीदारांवर फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. सोमवारी रात्री उशीरा वसंतनगर पोलिसांनी आरोपी भाऊ आणि बँक मॅनेजरसह नऊ जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलिसांनी सुरू केला आहे. आरोपी भाऊ नंदकिशोर जुगलकिशोर जयस्वाल (वय-43), रश्मी नंदकिशोर जयस्वाल, रवी जयस्वाल, सदाशिव नाना मळमणे, लक्ष्मीकांत चौधरी, रवी धुळधुळे, राजू कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. तर जयश्री अजयकुमार मोरय्या (वय-45) असं फसवणूक झालेल्या फिर्यादी बहिणीचं नाव आहे. जयश्री यांनी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास वसंतनगर पोलिसांत आपल्या भावासह अन्य साथीदारांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- कर्जाच्या ओझ्यामुळे केली आत्महत्या, ‘या’ काळजीपोटी भावाचाही घेतला जीव लोकमत नं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी भाऊ नंदकिशोर यानं आपल्या बहिणीच्या नावानं बनावट बॅंक खातं उघडून, धनादेशावर बहिणीची खोटी सही करून तब्बल 27 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीनं अकोला जनता कमर्शिअल बॅंकेच्या पुसद शाखेचे तत्कालीन बँक मॅनेजर आणि लेखापाल यांच्या मदतीनं आपल्या बहिणीलाच गंडा घातला आहे. याप्रकरणी बँक मॅनेजर आणि लेखापालवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा- नोकरीचं आमिष दाखवत निवृत्त अधिकाऱ्याला लुबाडलं; आयुष्यभराच्या बचतीवर मारला डल्ला पुसद येथील रहिवासी असणारा भाऊ जयस्वाल यानं 2015 पासून होलसेल विक्रेत्यांकडून माल खरेदी करून विक्री केला. या व्यवहारापोटी बहिणीच्या बॅंक खात्याचा आधार घेवून, धनादेशावर बनावट स्वाक्षऱ्या करुन तब्बल 27 कोटी 25 लाख 34 हजार 866 रुपयांची मोरय्या यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर बहिण जयश्री यांनी 12 जुलै रोजी वसंतनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात