मुंबई, 26 एप्रिल: मुंबईतील घाटकोपरमध्ये शिवसेना नगरसेवकाकडून सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडवण्यात आल्याचं समोर आलं आहे. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर घरी आला असता शिवसेना नगरसेवकाकडून फटाके वाजवण्यात आले. एवढंच नाहीतर रुग्णाला आधीच श्वसनाचा त्रास होत असताना त्याला फटाक्याच्या धूरात चालतच घरी आणले. हा प्रकार घाटकोपर (पश्चिम) मधील वार्ड क्र.127 मध्ये घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होत आहे.
हेही वाचा..फक्त फुफ्फुस नव्हे तर शरीरातील या अवयवांवरही हल्ला करतोय Coronavirus
रुग्णाला आपली स्तूती करण्यास भाग पाडलं..
मिळालेली माहिती अशी की, घाटकोपर (पश्चिम) मधील वार्ड क्र.127 मधील एका कोरोनाबाधित रुग्णाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. रुग्ण वार्डात दाखल होताच शिवसेना नगरसेवक तुकाराम उर्फ सुरेश पाटील यांनी फटाके वाजवून त्याचे स्वागत केले. कोरोना विषाणूची बाअनेकांनी तर तोंडावर मास्क लावले नव्हते आणि सोशल डिस्टंसिंग तर नावालाही नव्हते. धा झालेल्या रुग्णाला श्वसनाचा त्रास होतो आणि या फटाक्याच्या धूरातून बरा झालेल्या रुग्णाला चालत घरापर्यंत आणण्यात आलं. धक्कादायक म्हणजे रुग्णाला कॅमरासमोर नगरसेवक सुरेश पाटील यांनी स्वतःची स्तुती करण्यास भाग पाडल्याचीही माहिती समोर आली आहे. सोशल डिस्टेंसिंग तर दूरच अनेकांनी तोंडावर मास्कही लावले नव्हते.
हेही वाचा..धक्कादायक! परळीत क्षुल्लक कारणावरुन उपसली तलवार, एकाचं नाक कापलं
दरम्यान, अशीच एका घटना काल, शुक्रवारी ठाण्यात घडली होती. लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत ठाण्यात सत्ताधारी शिवसेनेच्या खासदारांनी धान्य वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. ठाण्यातील पाटील वाडी येथे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी नागरिकांना धान्य वाटप केलं होतं.
बघतां बघतां ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. धान्य वाटपास्थळी लोकांनी एकच गर्दी केली. धान्य घेण्याकरता लोकांनी लांबच लांब रांग लावली होती. अनेकांनी तर तोंडावर मास्क लावले नव्हते आणि सोशल डिस्टेंसिंग तर नावालाही नव्हते. यामुळे अशा धान्य वाटपांचे कार्यक्रम कोरोनाला आमंत्रण तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय मंडळी आपापल्या परीने गरजूंना जेवण आणि धान्य वाटपाचा कार्यक्रम करत आहे. पण अशा ठिकाणी सोशल डिस्टेसिंगचे नियम पाळताना क्वचितच पाहायला मिळत आहे.
संपादन- संदीप पारोळेकर