Home /News /maharashtra /

मोठी बातमी! उदय सामंत यांना ABVP च्या पदाधिकाऱ्याकडून धमकीचा फोन?

मोठी बातमी! उदय सामंत यांना ABVP च्या पदाधिकाऱ्याकडून धमकीचा फोन?

अमरावती विद्यापीठ दौरा आटोपून उदय सामंत हे नागपूर विद्यापीठाकडे निघणार होते. त्याचवेळी उदय सामंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली.

मुंबई, 15 सप्टेंबर: राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ( ABVP)पदाधिकाऱ्यांकडून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदय सामंत सध्या अमरावती विद्यापीठ दौऱ्यावर आहेत. विद्यापीठांच्या अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात उदय सावंत आढावा बैठका घेत आहेत. अमरावती विद्यापीठ दौरा आटोपून उदय सामंत हे नागपूर विद्यापीठाकडे निघणार होते. त्याचवेळी उदय सामंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली. ही धमकी ABVPच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हेही वाचा...पुण्यात कोविड टेस्टिंग सेंटरवर राडा, स्वॅब घेतलेले सॅम्पल जमिनीवर फेकले...पाहा VIDEO शिवसेनाविरुद्ध भाजप संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आला होता. आता शिवसेना नेते उदय सामंत यांना धमकीचा फोन आला आहे. आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. आपण विद्यार्थ्यांच्या हिताचं काम करणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. दरम्यान उदय सामंत या धमकीची तातडीनं तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरला पोहोचू देणार नाही... उदय सामंत हे अमरावती विद्यापीठात परीक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी आले असताना काही संघटनांनी आम्ही उदय सामंत यांना नागपूरला पोहोचू देणार नाही, अशी फोन वरून धमकी दिल्याची  माहिती पत्रकार परिषदेत दिली. मात्र आपण अशा पोकळ धमक्यांना घाबरत नसून ज्या विद्यार्थी संघटनांना चर्चा करायचे असेल त्यांनी आपल्याशी चर्चा करावी असे आवाहन आमदार उदय सामंत सावंत यांनी केले. काही विद्यार्थी संघटना केवळ आपल्या राजकीय पक्षाला खुश करण्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप करत आहे. हे योग्य नसल्याचे  सावंत यांनी यावेळी सांगितले. काही सुधारणा असल्यास आम्ही त्याचा जरूर स्वीकार करू, असेही यावेळी उदय सावंत यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर देखील पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री'वर फोन करुन धमकी दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान 'मातोश्री'वर काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला होता. धमकी देणाऱ्याने दुबईवरुन बोलतोय, मातोश्रीला उडवून टाकी, अशी धमकी दिली होती. उद्धव ठाकरेंच्या रायगडमधील फार्म हाउसची काही अज्ञातांनी रेकी केली होती. यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे दया नायक यांनी मोठी कारवाई करत मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. नायक यांनी कोलकातामधून आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत आज 4 वाजता पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जाणार आहे. दुबईहून मातोश्रीवर तीन ते चार फोन करण्यात आले होते.त्यात मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मातोश्री निवासस्थानाबाहेर पोलिस सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रायगडमधील खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाउसवर टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली होती. हेही वाचा...माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणखी तापणार? शिवसैनिकांची सशर्त जामिनावर सुटका फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस करण्यात आली होती. याप्रकरणी मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर रेकी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Abvp

पुढील बातम्या