मुंबई, 17 सप्टेंबर: मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असताना एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख (Sachin Deshmukh) यांचा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये सचिन देशमुख यांना दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 52 वर्षांचे होते.
हेही वाचा...कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक, पालकमंत्र्यांनी घेतलं तोंडसुख
सचिन देशमुख हे एक अष्ठपैलू क्रिकेटपटू होते. मुंबई आणि महाराष्ट्र रणजी संघात (Ranji Trophy)ते खेळले होते. मात्र, प्लेइंग इलेवनमध्ये त्यांना संधी मिळाली नाही. सचिन देशमुख हे मुंबईत एक्साइज एंड कस्टम डिपार्टमेंटमध्ये सुपरिटेंडेंट म्हणून कार्यरत होते.
धमाकेदार फलंदाज हरपला...'दी टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपात्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सचिन देशमुख यांच्या नेतृत्त्वातील 1986 मध्ये झालेल्या कूच विहार ट्रॉफीत संघातने धमाकेदार कामगिरी केली होती. सचिन यांनी स्वत: 3 सामन्यात 3 शतके ठोकले बोते. त्यात सचिन यांनी 183, 130 आणि 110 अशा धावा केल्या होत्या, अशी माहिती सचिन यांचे जवळचे मित्र अभिजीत देशमुख यांनी दिली.
7 सामन्यात 7 शतके...
90 दशकात इंटर यूनिर्व्हसिटी टूर्नामेंटमध्ये सचिन देशमुख यांनी दमदार कामगिरी केली होती. 7 सामन्यात सलग 7 शतके ठोकून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. सचिन हे मधल्या फळीतील धमाकेदार फलंदाज होते.
माजी विकेटकीपर माधव मंत्री यांनी सांगितलं की, सचिन देशमुख हे एक प्रतिभावंत आणि गिफ्टेड क्रिकेटपटू होते. रमेश वाजगे यांनी सांगितलं की, सचिन यांचं अकाली जाणं, हे धक्कादायक आहे. त्यांचा मृत्यू म्हणजे प्रत्येकाला एक संदेश आहे. कोरोनाला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. दरम्यान, सचिन वेळेत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असते तर त्यांचा जीव वाचवता आला असता, असही रमेश वाजगे यांनी सांगितलं.
देशात 24 तासांत 98 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद
सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा अंदाजही अनेकांनी व्यक्त केला आहे. साधारण दर दिवसाला कोरोनाचे 85 ते 95 च्या आसपास नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या नवीन आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 97 हजार 894 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
हेही वाचा...सौरव गांगुलीचा हृतिकला सल्ला, बायोपिकमध्ये त्याची भूमिका करायची असेल तर...
देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा आकडा 50 लाख पार झाला असून 51 लाख 18 हजार 254 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 24 तासांत 1 हजार 132 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा आकडा 83 हजार 198 वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्याही 40 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 80 रुण बरे झाले असून बुधवारी विक्रमी 82 हजार 922 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 10 लाख 9 हजार 976 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.