Home /News /entertainment /

श्रीदेवीमुळे अनिल आणि बोनी कपूर यांच्यात झालं होतं जोरदार भांडण, वाचा नेमकं काय घडलं

श्रीदेवीमुळे अनिल आणि बोनी कपूर यांच्यात झालं होतं जोरदार भांडण, वाचा नेमकं काय घडलं

अनिल कपूर आणि बोनी कपूर यांच्यात एकदा जोरदार भांडण झालं होतं आणि याचं कारण होतं अभिनेत्री श्रीदेवी.

  मुंबई, 24 मे : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि बोनी कपूर या दोन्ही भावांची गिनती बॉलिवूडच्या अशा भावांमध्ये केली जाते. ज्यांच्या अनेक वर्षांच्या करिअरमध्येही कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण दिसून आलेलं नाही. पण फार कमी लोकांना माहित आहे या दोघांमध्ये सुद्धा एकदा जोरदार भांडण झालं होतं आणि याचं कारण होतं अभिनेत्री श्रीदेवी. या दोघांमधील वाद एवढे विकोपाला गेले होते की, रागाच्या भरात अनिल कपूर मिस्टर इंडियाचं शूटिंग अर्धवट सोडूनच निघून गेले होते. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार ही घटना तेव्हाची आहे जेव्हा बोनी कपूर मिस्टर इंडियाच्या प्रोडक्शनमध्ये खूप बिझी होते. या सिनेमात श्रीदेवींनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारावी असं बोनी कपूर यांना वाटत होतं मात्र श्रीदेवींनी त्यांची ही ऑफर धुडकावून लावली. नंतर त्यांनी या सिनेमासाठी खूप मोठी रक्कम मानधन म्हणून मागितली. त्यावेळी श्रीदेवी 10 लाख रुपये सिनेमाचं मानधन म्हणून मागितलं होतं आणि ही गोष्ट बोनी कपूर यांना समजली तेव्हा ते त्यांना 11 लाख रुपये मानधन देण्यास तयार झाले. त्यावेळच्या हिशोबानं ही रक्कम खूप मोठी होती. सपना चौधरीला स्टेजवर सर्वांसमोर तरुणानं केलं KISS, सोशल मीडियावर Photo Viral बोनी कपूर यांच्या या निर्णयाबाबात जेव्हा अनिल कपूर यांना समजलं तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यावेळी अनिल कपूर यांनी सुद्धा या सिनेमासाठी आपला पैसा लावला होता. त्यामुळे ते प्रत्येक अनावश्यक खर्चाबद्दल खूप जागरुक होते. त्यांना जेव्हा श्रीदेवींच्या फी बद्दल समजलं. तेव्हा त्यांना राग अनावर झाला.
  हे सर्व घडलं त्यावेळी श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात ब्रेकअप झालं होतं. दुसरीकडे श्रीदेवींची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची झाली होती. त्यांच्या आईची तब्येत सुद्धा खूप बिघडली होती आणि श्रीदेवींचा सर्वात जास्त पैसा हा त्यांच्या आजारपणासाठीच्या उपचारांमध्ये जात होता. हे सर्व बोनी कपूर यांना समजलं तेव्हा त्यांनी श्रीदेवींच्या आईच्या उपचारांची पूर्ण जबाबदारी घेतली. श्रीदेवी आणि त्यांच्या आईचं अमेरिकेचं तिकिट बुक करून त्यांना उपचारांसाठी पाठवून दिलं. या सर्वाची माहिती अनिल कपूर यांच्या मिळाली आणि त्यांनी मिस्टर इंडियाचा सेट सोडून निघून गेले. शिल्पा शेट्टीनं या कारणासाठी राज कुंद्राशी केलं लग्न, 11 वर्षांनी झाला खुलासा त्यावेळी अशी परिस्थिती झाली होती की, अनिल कपूर यांनी सिनेमा जवळजवळ सोडल्यात जमा होता. पण नंतर जेव्हा दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांच्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी सिनेमात परत येण्यासाठी काही अटी ठेवल्या. त्यातली महत्त्वाची अट ही होती ती ते प्रॉडक्शनचं काम सोडून देतील. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनिल कपूर यांनी नफ्यातील मोठ्या रकमेवर दावा केला होता. बॉलीवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं स्वत:ला क्वारंटाईन
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Sridevi

  पुढील बातम्या