बॉलिवूड ही महाराष्ट्र आणि मुंबईची देन, स्टार अभिनेत्याने दिले योगी सरकारला प्रत्युत्तर

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता गोविंदा आपल्या पत्नीसह यावेळी उपस्थितीत होता.

शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता गोविंदा आपल्या पत्नीसह यावेळी उपस्थितीत होता.

  • Share this:
बीड, 13 डिसेंबर : मुंबई फिल्मसिटीला (mumbai film city) उत्तर प्रदेशला हलवण्याच्या मुद्यावरून बराच वाद पेटला होता. पण "बॉलिवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात शरद पवार सारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर आहे. महाराष्ट्र सार्वभौम असून महाराष्ट्राने देशाला कला, संस्कृती, इंडस्ट्री अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत' असं म्हणत अभिनेता गोविंदाने (Govinda) योगी सरकारला प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिनेता गोविंदा आपल्या पत्नीसह यावेळी उपस्थितीत होता.  तब्बल 21 वर्षांनंतर  गोविंदा पुन्हा परळीत आले होते.. 'धनु तू आगे बडेगा' असे कौतुक गोविंदा यांनी 1999 च्या कार्यक्रमात केलं होतं म्हणून आभार मानण्यासाठी बोलवलं, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.  धनंजय मुंडे,  गोविंदा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 81 किलोचा केक कापून शरद पवार यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी  संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, 5000 महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेतले. ...अन्यथा रद्द होईल रेशन कार्ड; नाव रद्द करण्याबाबत मोठा निर्णय पुढे बोलताना गोविंदा यांनी 'परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून, येथे प्रामाणिकपणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो, असे गौरवोद्गार काढले. 'धनंजय मुंडे यांनी ने जी सर्वसामान्य लोकांची सेवा केली आहे. ते सगळं देव पाहत असून तो त्यांच्यासोबत आहे. धनंजय मुंडे सारखा नेता हा खऱ्या आयुष्यातला हिरो आहे' या शब्दांत गोविंदा यांनी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पत्नी सुनीता आहुजा यांच्यासह दुसऱ्यांदा परळीत आलेल्या अभिनेता गोविंदा यांनी 21 वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आपल्याला परळीला आणले होते. 'आज पुन्हा 21 वर्षांनी परळीत आलो, इथल्या लोकांचे धनंजय मुंडे यांच्यावरील प्रेम पाहून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणखी मोठे होईल', असा विश्वास व्यक्त केला. 'तीन कायदे, तीन तऱ्हा', संजय राऊतांनी केली कृषी कायद्याची पोलखोल 'शरद पवार यांनी विश्वास टाकला नसता तर धनंजय इथे दिसला नसता.12 डिसेंबर हा उपकार फेडायचा दिवस आहे' अशा शब्दांत  धनंजय मुंडे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'इव्हेंट करायचं त कलाकाराला पुन्हा बोलवत नाहीत पण आम्ही प्रेम केले तर मनांतून करतो म्हणून बोलवलं  देव कोणी पहिला असेल मला माहित नाही. मात्र  पवार च्या रूपान देव माणूस पहिला. अडचणीत बाहेर काढण्यासाठी देव च देव माणूस पाठवतो तो देव माणूस पवारसाहेब आहेत. परळी मतदार संघाच्या वतीने प्रभू वैद्यनाथ चरणी विनंती साहेबांना दीर्घ आयुष्य दे..भविष्यात महाराष्ट्रची सेवा घडू दे', अशी मागणी मुंडे यांनी मागितली.
Published by:sachin Salve
First published: