मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुण्यात कर्जाचं व्याज न दिल्यानं विद्यार्थ्याचं अपहरण; हॉस्टेलमध्ये डांबून केली मारहाण

पुण्यात कर्जाचं व्याज न दिल्यानं विद्यार्थ्याचं अपहरण; हॉस्टेलमध्ये डांबून केली मारहाण

बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. (File Photo)

बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. (File Photo)

Crime in Pune: पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं घेतलेल्या कर्जावरील व्याज न दिल्यानं (For not paying loan interest) काही जणांनी त्याचं अपहरण (engineering student kidnapped) करून त्याला बेदम मारहाण (Beat) केली आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 23 मे: पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानं घेतलेल्या कर्जावरील व्याज न दिल्यानं (For not paying loan interest) काही जणांनी त्याचं अपहरण (engineering student kidnapped) करून त्याला बेदम मारहाण (Beat) केल्याची घटना समोर आली आहे. पैशासाठी वडिलांना फोनवरून संपर्क साधला असता मुलाचं अपहरण झाल्याची माहिती वडिलांना समजली. यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याची सुटका केली असून दोन जणांना अटक ( 2 Arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

संबंधित अपहरण झालेल्या 24 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव अनिकेत राज असून तो कात्रज परिसरातील बालाजी व्हिला परिसरातील रहिवासी आहे. त्यानं अपहरणकर्त्यांपैकी दोघांकडून 1 लाख 40 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाचे पैसे घेताना पीडित विद्यार्थ्यानं दरमहा 20 हजार रुपये देण्याचं मान्य केलं होतं. पण दरम्यान लॉकडाऊन लागू झाल्यानंतर त्याला कर्जाच्या पैशावरील व्याज देता आलं नाही. त्यानं केवळ मुद्दल परत केली. यामुळे संबंधित आरोपींनी  18 मे रोजी आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं अनिकेत राजचं अपहरण केलं.

पुण्यातील स्टेन्जा हॉस्टेलमध्ये त्याला डांबून ठेवण्यात आलं. यानंतर आरोपींनी त्याला जवळच्याच एका सदनिकेत नेऊन डांबल. याठिकाणी आरोपींनी पीडित युवकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्याचबरोबर व्याजाच्या पैशांच लगेच आयोजन करण्याचा तगादा लावला. यावेळी पीडित मुलानं व्याजाच्या पैशांसाठी आपल्या वडिलांना फोन करून अपहरण झाल्याची माहिती दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांना मुलाच्या अपहरणाची माहिती दिली.

हे ही वाचा-हात-पाय बांधून दलित तरुणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितलं असता पाजलं मूत्र

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून पीडित अनिकेतची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेतनं दिलेल्या तक्रारीनुसार, गिरीश कदम, दीपक प्रदीपकुमार सिंग, गणेश मानकर, निखील नंदकुमार कदम आणि त्यांच्या अन्य तीन ते चार साथीदारांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Kidnapping, Pune, Student