कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या BMCच्या योद्धांसाठी महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतला मोठा निर्णय

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या BMCच्या योद्धांसाठी महापौर किशोरी पेडणेकरांनी घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावताना महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास...

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल: कोरोना विषाणूविरुद्ध लढणाऱ्या बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या (BMC) योद्धा अर्थात कर्मचाऱ्यांबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या महामारीत कर्तव्य बजावताना महानगरपालिकेच्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कटुंबातील एका सदस्याला तत्काळ नोकरी देण्यात येईल. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य सरकारद्वारा घोषित करण्यात आलेल्या 50 लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळेल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा.. पवारांच्या बारामतीत चाललंय तरी काय, ऐतिहासिक वास्तू रातोरात केली जमीनदोस्त

दरम्यान, कोरोनाशी लढा देताना प्राण गमावलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पोलिस खात्यातील योद्धांना 50 लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ही घोषणा केली होती. महाराष्ट्रात आतापर्यंत 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 17 अधिकाऱ्यांचा, तर 90 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाविरुद्ध लढा देताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

हेही वाचा.. चिंता वाढली, औरंगाबादेत दिवसभरात 47 पॉझिटिव्ह रुग्ण,आजपर्यंतचा मोठा आकडा

अनिल देशमुख म्हणाले, मुंबई पोलिसांच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या युद्धात बलिदान दिले आहे. सरकार दोन्ही कुटुंबियांसोबत आहे. दोन्ही परिवारांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येईल.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 30, 2020, 11:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या