चिंता वाढली, औरंगाबादेत दिवसभरात 47 पॉझिटिव्ह रुग्ण,आजपर्यंतचा मोठा आकडा

चिंता वाढली, औरंगाबादेत दिवसभरात 47 पॉझिटिव्ह रुग्ण,आजपर्यंतचा मोठा आकडा

मुंबई, पुणेपाठोपाठ आता औरंगाबादेत कोरोनानं थैमान घातलं आहे. शहरातील काही परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 30 एप्रिल: मुंबई, पुणेपाठोपाठ आता औरंगाबादेत कोरोनानं थैमान घातलं आहे. शहरातील काही परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. परिणामी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात दिवसभरात शहरात कोरोनाचे 47 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 177 वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

शहरात गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुकुंदवाडीत 18 रुग्ण, नूर कॉलनी 2, बीड बायपास 1, खडकेश्वर 1, रोहिदासनगर 4 रुग्ण, नारेगाव, अजीज कॉलनी प्रत्येकी 2, रोशन गेट 1, भीमनगर 2 तर किले अर्क परिसरातील 4 रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा.. ...तर कोरोनापेक्षा उपासमारीने मरणाऱ्यांची संख्या असेल जास्त : नारायण मूर्ती

पोलिस कोठडीतील आरोपीला कोरोना

शहरातील सिटी चौक पोलिस स्टेशनमधील सर्वा पोलिसांनी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. आता या आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता या पोलिस स्टेशनमधील सर्व पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना क्वॉरंटाइन केले आहे. एसआरपी जवानालाही लागण झाल्यामुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडण्याच्या वेळा ठरविण्यात आल्या आहेत.

हेही वाचा.. पुण्यात अडकलेल्यांनी आहे त्याच ठिकाणी रहावे, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा खुलासा

दुसरीकडे, राज्यात गुरुवारी 583 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 10,498 वर पोहोचला आहे. तर दिवसभरात 27 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 30, 2020, 10:38 PM IST

ताज्या बातम्या