नवी मुंबई, 31 मे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (navi mumbai corporation election) तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेना (Shivsena)आणि राष्ट्रवादीत (NCP) इन्कमिंग सुरू असताना आता भाजपला मनसेनं धक्का दिला आहे. भाजपचे (BJP) कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे (Nitin kale) यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये पडझड पाहण्यास मिळत आहे. भाजपचे अनेक नगरसेवक हे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनीही आता मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
परमबीर यांच्या सांगण्यावरूनच वाझेकडून वसुली, कार डिझायनरचं CM ना पत्र
आगामी नवीमुंबई निवडणुकीत नितीन काळे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील शहापूरमध्ये शेकडो शिवसैनिकांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता.
नवी मुंबई निवडणुकीत गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला
2019 मध्ये गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत कमळ हाती घेतलं. नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनीही पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. नाईक यांचं पक्ष सोडून जाणं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीने या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि माथाडी कामगारांचे नेते अशी ओळख असलेले शशिकांत शिंदे हे खास लक्ष ठेवून आले.
झटापटीदरम्यान बालकनीमधून खाली कोसळले पती-पत्नी, थरारक VIDEO VIRAL
दुसरीकडे, गणेश नाईक यांनीही आपला बालेकिल्ला अजिंक्य राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर शिवसेनाही शहरात आपली ताकद राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंजक ठरणार, यात अजिबातच शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.