भागवत हे 1995 ते 2009 पर्यंत 3 वेळा औरंगाबादचे नगरसेवक होते. 1999 आणि 2006 असे दोन वेळा औरंगाबादचे महापौर होते. 2009मध्ये भाजपातर्फे औरंगाबाद पूर्व मतदार संघातून निवडणूक लढवली पण पराभूत झाले.भाजपमध्ये शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, मनपा गटनेता व भटक्या विमुक्त आघाडीचा अध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. सध्या ते पक्षात प्रदेश चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातलं चिखली हे त्यांचं मुळ गाव. त्यांचे वडिल शेतकरी होते. त्यांनी म्हटलंय की आमच्याकडे शेतीसुद्धा कोरडवाहू व जेमतेम 7 एकर होती. माझे सातवी पर्यंतचे शिक्षण चिखली या जि. प.च्या शाळेत झाले तर 8 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण 5 कि. मी. लांब असलेल्या अंधोरी जि. प. शाळेत झाले.