बीड, 26 जून : ‘ओबीसींच्या आरक्षण (OBC Reservation) प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यांत आहे का? असा सवाल करत भाजपच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे (pritam munde) यांनी नाव न घेता धनंजय मुंडे (dhanjay munde) यांना टोला लगावला आहे. तसंच, सगळंच जर केंद्राकडून मागायचं असेल राज्य चालवायला माणूसही मागून घ्या, असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला. बीडमधील (beed) परळी इथं प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते. परळी शहरातील इटके कॉर्नरवर हा चक्काजाम करण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या चक्का जाममुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोरोना काळात महिलांमध्ये वाढल्या पाळीच्या समस्या; लक्षणं दिसली तर दुर्लक्ष नको ‘महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. कोरोनातील कुठल्या ही प्रश्नासंदर्भात केंद्र सरकार काहीच देत नाही, असं बोलत आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. केंद्राने हे केलं नाही, ते केलं नाही. केंद्राकडून सगळं मागायचं असेल तर राज्य चालवायला केंद्राकडून माणूस मागून घ्या, भाजपमध्ये मध्ये खूप खमके माणस आहेत. राज्य चांगल्या पद्धतीने चालू शकतात, असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला. मोठ्या बहिणीला छेडणाऱ्या रोडरोमिओला धाकट्या बहिणीने धू धू धुतला; VIDEO VIRAL दरम्यान, चक्का जाम आंदोलनाला जाण्यापूर्वी खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चक्का जामनंतर राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल, असा इशाराही प्रीतम मुंडे यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.