सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 26 जून: मुलींना एकटे पाहून त्यांची छेड काढणं एका रोडरोमिओला चांगलेच महागात पडले आहे. ज्या मुलींची छेड काढत होता त्या मुलींनीच त्याला चांगली अद्दल घडवली आहे. आपल्या बहिणीकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या या रोडरोमिओला लहान बहिणीने (Road Romeo beaten by girl) चांगलेच बदडले आहे. औरंगाबादमधील (Aurangabad) ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद (Incident caught in mobile camera) झाली आहे. औरंगाबादमधील दोन बहिणी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी दोन रोडरोमिओ मोठ्या बहिणीची छेड काढत अश्लील हावभाव करत होते. ही बाब लहान बहिणीच्या लक्षात येताच तिने या रोडरोमिओंना धडा शिकवण्याचं ठरवलं. Pune New Restrictions: पुण्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; वाचा काय सुरू काय बंद लहान बहिणीने या दोन्ही रोडरोमिओंना पकडून जाब विचारला. इतकेच नाही तर तिने धाडस दाखवत या रोडरोमिओंची भररस्त्यात धुलाई सुरू केली. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादमधील सूतगिरणी चौकात हा संपूर्ण प्रकार घडल्याचं बोललं जात आहे. या तरुणीने केलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. या मुलीने मारहाण करताच या रोडरोमिओंनी घटनास्थळावरुन आपली दुचाकी सोडून पळ काढला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.