मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बाप्पाची मूर्ती गढूळ पाण्यात दिली ढकलून, नवनीत राणांचा Video पाहून नागरिकांचा संताप

बाप्पाची मूर्ती गढूळ पाण्यात दिली ढकलून, नवनीत राणांचा Video पाहून नागरिकांचा संताप

सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

सर्वसामान्य नागरिकांसह विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

अमरावती, 10 सप्टेंबर : आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमधील त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अमरावती जिल्ह्यातील गांधी नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणावर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जोरदार राडा घातला होता.

आपला फोन रेकॉर्ड कसा केला, या मुद्यावरून नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केली.  यानंतर पोलीस पत्नी त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा यांनी माफी मागावी, अशी त्यांची मागणी आहे.

'तर थू आहे तुमच्या डिपार्टमेंटवर', नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, VIDEO

यापूर्वी हनुमान चालिसा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन त्यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता.आता गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देव-देवतांविषयी बोलणाऱ्या नवनीत राणांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओत नवनीत राणा, पती रवी राणा आणि कार्यकर्त्यांसोबत विसर्जन करण्यासाठी जाताना दिसत आहे. मात्र ज्या पद्धतीने बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं, त्यावरुन नागरिकांनी नवनीत राणांना घेरलं आहे.

गणेश विसर्जनाची एक पद्धत असते. मात्र राणा दाम्पत्याने थेट वरुनच बाप्पाची मूर्ती ढकलून दिल्याने सांगत विरोधकांकडून त्यांवर जोरदार टीका केली जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते अमोल मिटकरी यांनीही संताप व्यक्त केला आहे. राणा दाम्पत्याने जे काही केलं, त्यावरुन त्यांचं हिंदूत्व बेगडी आहे, असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

First published:

Tags: Amravati, Ganesh chaturthi, Navneet Rana