जालना, 29 मे: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे (MP Chhatrapati Sambhaji Raje) यांनी महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली. दरम्यान शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर संभाजी राजेंनी पत्रकार परिषदेत घेतली. या परिषदेत त्यांनी राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम दिलं आहे. 6 जून शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी घेतलेल्या भूमिकेवर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संभाजीराजे घेतील त्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील असं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. तर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाच्या मागणीकडे डोळेझाक केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एकीकडे नारायण राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे छत्रपती संभाजीराजे हे सत्ताधाऱ्यांची भेट घेण्यावरून टीका करत असले तरी राणे आणि चंद्रकांत पाटील यांचं स्टेटमेंट मी ऐकलं नसल्याचं निलंगेकर यांनी म्हटलं आहे. पण मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही राजेंनी मांडलेली भूमिका योग्यच असल्याचं निलंगेकर म्हणालेत. राजेंनी मराठा समाजाच्या हितासाठी घेतलेल्या प्रत्येक भूमिकेला आमचा पाठिंबा असेल असंही निलंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा- VIDEO: भयंकर! भररस्त्यात डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येचा थरार संभाजीराजे शरद पवारांना भेटल्यानं निलेश राणे संतापले 27 मे रोजी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संभीजीराजे छत्रपतींवर जहरी टीका केली. मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला मराठा समाजाने ठेका दिलेला नाही, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.