राजस्थान, 29 मे: भरदिवसा एका डॉक्टर दाम्पत्या (Doctor couple)ची हत्या झाली आहे. ही धक्कादायक घटना राजस्थान (Rajasthan) मधील हिरादास या भागात घडली आहे. शहरातील हिरादास बस स्थानकाजवळ असलेल्या चौकात दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी या दाम्पत्यावर भररस्त्यात गोळीबार केला. गोळीबार (Shot Dead)करुन आरोपींनी पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4.45 वाजता डॉक्टर दाम्पत्यावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञातांनी या दाम्पत्याला एका सिग्नलवर ओव्हरटेक केलं आणि त्यानंतर त्यांच्या गाडी पुढे येऊन त्या दोघांवर गोळीबार केला.
वीडियो राजस्थान के भरतपुर का है. बदमाशों ने दिनदहाड़े चिकित्सक दंपति की हत्या कर दी. @PoliceRajasthanpic.twitter.com/oG7hEeDBHv
— Ranvijay Singh (@ranvijaylive) May 28, 2021
ओव्हरटेक केल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरुन उतरले आणि डॉक्टरांच्या गाडीपर्यंत चालत गेले. आरोपींना बघून डॉक्टरांनी आपल्या कारची खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्यावर लगेचच हल्ला करत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनास्यातून ही हत्या झाली आहे. एका तरुणीच्या हत्या प्रकरणात हे डॉक्टर दाम्पत्याचा सहभाग होता. मृत तरुणीचा डॉक्टरसोबत संबंध होते असा आरोप होता. हेही वाचा- VIDEO: पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीचा थरारक व्हिडिओ डॉक्टर दाम्पत्यावर गोळीबार करणारा हा त्याच मृत तरुणीचा भाऊ असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर दोन वर्षांपूर्वी या तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्या हत्येप्रकरणात डॉक्टरची पत्नी आणि आई आरोपी असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

)







