मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'कोण आहे हा हरामखोर' लातूरमध्ये भाजप आमदार बँकेच्या कर्मचाऱ्यावर संतापले, VIDEO

'कोण आहे हा हरामखोर' लातूरमध्ये भाजप आमदार बँकेच्या कर्मचाऱ्यावर संतापले, VIDEO

 लातूरमध्ये (latur) नुकत्याच पार पडलेल्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या अर्ज छाननीत भाजप उमेदवारांचे सर्वच्या सर्व अर्ज बाद ठरवण्यात आले.

लातूर, 25 ऑक्टोबर : राज्यात मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, लातूरमध्ये (latur) डीसीसी बँकेच्या निवडणुकीत ( DCC Bank election) अर्जबाद झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या गोंधळात भाजपचे आमदार रमेश कराड (bjp mla ramesh karad) यांची जीभ घसरली. 'कोण आहे हा हरामखोर' असं म्हणत डीसीसी बँकेच्या (dcc bank) कर्मचाऱ्यावर संतापल्याचे पाहण्यास मिळाले. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या अर्ज छाननीत भाजप उमेदवारांचे सर्वच्या सर्व अर्ज बाद ठरवण्यात आले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतला.

निवडणूक अधिकारी आणि बँक अधिकाऱ्यांच्या साहाय्यानं भाजप उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले, मात्र काँग्रेस उमेदवारांवर थकबाकी असूनही त्यांचे अर्ज बाद का नाही झाले? याचा लेखाजोखा आम्हाला द्या, या मागणीसाठी भाजप आमदार रमेश कराड व भाजप उमेदवारांनी गोंधळ घातला.

तरुणीला करायची होती सामूहिक बलात्काराची तक्रार, घाबरलेल्या आरोपींनी केला खून

रमेश कराड आणि कार्यकर्त्यांनी डीसीसी बँकेच्या एमडीच्या दालनात ठिय्या मांडला. एमडीला घेराव घालत आंदोलन केलं. चार तासांहून अधिक कालावधी झाला तरी भाजप उमेदवार आणि आमदार रमेश कराड आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एमडीकडून देखील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यानं हे आंदोलन अधिक चिघळले.

दरम्यान, एका कर्मचाऱ्याने अरेरावी केल्यानं भाजप आमदार त्याच्यावर भडकले आणि तो हरामखोर कोण असा संतापात प्रश्न केला. अखेर बऱ्याच वादावादीनंतर रमेश कराड आपल्या कार्यकर्त्यांसह बँकेतून निघून गेले. या गोंधळामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

First published: