नाशिक, 05 जून : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी पुन्हा एकदा खालच्या भाषेत टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहे. नाशिकमध्ये सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद भरवली होती. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. ‘दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत. इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आले होते. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या XXXवर लाथ घाला असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त विधान पडळकर यांनी केलं. ( BREAKING : उत्तरकाशीमध्ये हाहा:कार, 32 प्रवाशांनी भरलेली मिनीबस दरीत कोसळली ) तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आदेशाचे पालन करणार का? उद्धव ठाकरे सध्या रिमोट कंट्रोलवर काम करत आहेत, अशी टीकाही पडळकरांनी केली. कांद्याचा ज्युस प्यायला तर कपडे काढून नाचाल -सदाभाऊ खोत तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी कांद्याच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ‘आमच्या काळात कांद्याचे दर पडले तर आम्ही 2 रुपये कांद्याला अनुदान दिले. अनुदानाच्या माध्यमातून 200 कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिले. केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही कांदा दर कोसळल्यानंतर निर्यात प्रोत्साहन दर देखील दिले. कांदा व्यापाऱ्यावर धाडी पडत असताना मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगितले हे थांबवा. सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असताना देखील सध्याचं सरकार काही करत नाहीये. केंद्राला प्रस्ताव पाठवा आम्ही तुमच्यासोबत येतो. गुजरात सरकारने जर किलोमागे कांद्याला 3 रुपये अनुदान देत असेल तर मग तुम्ही का देत नाही. महाराष्ट्रात देखील कांद्याला आता 5 रुपये अनुदान द्यावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. ( Fact Check : वॉटर पार्कमध्ये स्लायडिंग करणाऱ्या महिलेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू? ) ‘कांद्याचे दर घसरले आहेत तुम्ही घरातून सुधा निघायला तयार नाही. राज्यात कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी स्वतः उन्हात थांबून कांदा चाळीत कांद्याला फॅनचे हवा देत आहे. उद्धव ठाकरे,अजित पवार तुम्ही इथे येऊन पहा. तुम्हाला दारूवर खूप प्रेम आहे ग्लास मध्ये कांद्याचे ज्युस भरून पाजणार, आमचा ज्युस प्यायला तर कपडे काढून नाचाल, अशी टीकाही खोत यांनी केली. ‘एक आठवड्यात कांदा प्रश्न सुटला नाही तर मंत्रालय समोर आंदोलन करणार, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.