Home /News /maharashtra /

भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निषेधार्थ मांडला ठिय्या, गुन्हा दाखल

भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निषेधार्थ मांडला ठिय्या, गुन्हा दाखल

शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जामनेरात भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

जामनेर, 23 जून: महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जामनेरात भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यामध्ये 100 ते 125 कार्यकर्त्यांच्या उपस्थित होतं. नगरपालिकेसमोरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मात्र, यावेळी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडला. हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यानं केला एकेरी उल्लेख, शिवसैनिक संतापले! लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भाजप आमदार गिरीश महाजन मंगळवारी रस्त्यावर उतरले. भाजपाच्या या शेतकरी आंदोलनात मात्र सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. भाजप कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर राज्य सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. आमदार गिरीश महाजन यांनी सांगितलं की, राज्य सरकारने जामनेरमधील एकही खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. आज रोजी कापूस, हरभरा, तूर, मका शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. फक्त मिटिंगमध्ये दंग झालेले सरकार आहे. सरकारने घोषणा केली होती शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन कर्ज देण्यात येईल. पण असे कुठलेही वाटप करण्यात आलेले नाही. बँकेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज दिले नसून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागत आहे. शासनाने पाहणी केल्यानंतर जामनेर मधील सीसीआय केंद्र सर्व बंद करण्यात आलेले आहे. मका, कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खरीप हंगामाची पेरणी झाली असून युरिया खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने दागिने विकण्याची व सावकाराजवळ ठेवण्याची वेळ सरकारने शेतकऱ्यांवर आणली आहे. हेही वाचा...'कोरोनिल'ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेवांनी केले स्पष्ट राज्य स्तरावर शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजप सरकार ठिय्या आंदोलन करून तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे आमदार गिरीश महाजन यांनी निवेदन दिले. सर्व कार्यकर्त्यांवर शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.
First published:

Tags: Farmer, Girish mahajan, In Jalgaon, Jamner, Udhav thackeray

पुढील बातम्या