मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

श्रीराम पूजनावरून औरंगाबादेत धरपकड, हे सरकार निजामशाहीचं; भाजप आमदाराचा आरोप

श्रीराम पूजनावरून औरंगाबादेत धरपकड, हे सरकार निजामशाहीचं; भाजप आमदाराचा आरोप

 राज्यातील सरकार हिंदुत्वाच नाही, भाजपचा घणाघाती आरोप

राज्यातील सरकार हिंदुत्वाच नाही, भाजपचा घणाघाती आरोप

राज्यातील सरकार हिंदुत्वाच नाही, भाजपचा घणाघाती आरोप

औरंगाबाद, 7 ऑगस्ट: अयोध्येत 5 ऑगस्टला श्रीराम मंदिराचं भूमिपूजन झालं. आता गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक राम मंदिरांचं भूमिपूजन झालं. संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला, मात्र श्रीराम पूजन केल्यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर नॉनबेलेबल गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या कृतीचा निषेध करण्यासाठी भाजप पुन्हा आंदोलन करणार आहे. राज्यातील सरकार हिंदुत्वाच नाही, असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार अतुल सावे यांनी केला आहे.

हेही वाचा...मनसे नगरसेवकावर भडकले अजित पवार; म्हणाले, लांबून बोला...आमचे 4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह!

भाजपनं जल्लोष रॅली काढून श्रीराम पूजन केलं म्हणून त्याच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे सरकार निजामशाहीचं असल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला. आमदार सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

परवानगी नसताना भाजपनं काढली जल्लोष रॅली...

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची परवानगी नसतानाही औरंगाबाद शहरात भाजपनं जल्लोष रॅली काढली होती. भाजपच्या जल्लोष रॅलीत शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला होता. गजानन महाराज मंदिर चौकात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी भाजप कार्यकार्ये आणि आमदारांना घरी पाठवून दिलं होतं. आता मात्र, पोलिसांची धरपकड सुरू केली आहे. भाजप कार्यकर्त्यांवर नॉनबेलेबल गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यावरून भाजप आमदार अतुल सावे संतापले आहेत. पोलिसांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भाजप पुन्हा आंदोलन करणार असल्याच्या इशारा आमदार सावे यांनी दिला आहे.

सामूहिक जल्लोषास परवानगी नाही..

राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त अयोध्येला जाता आलं नाही तरी आपापल्या घरीच दिवे लावून किंवा मंदिर, गुरुद्वारावर रोषणाई करावी. नागरिकांनी मंदिरातही प्रत्येकी एक दिवा लावावा,असे आवाहन विश्व हिंदू परिषद, बजरंग, दल, भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केलं होतं. बुधवारी प्रत्येकाने घरासमोर रांगोळी काढावी, भगवा ध्वज लावावा.

हेही वाचा... 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी, मुंबई हायकोर्टानं बदलला ठाकरे सरकारचा आदेश

रामरक्षा स्तोत्र म्हणावे, ‘जय जय श्रीराम’ विजय मंत्राचा घोष करावा. श्रीरामाची आरती करून प्रसादाचे वाटप करावे. सायंकाळी तुळशी वृंदावनाजवळ पाच दिवे लावावेत. जवळच्या मंदिरात जाऊन शक्य असेल तर आरती करावी. या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्कही लावावा, असं आवाहन विहिंपचे महानगर अध्यक्ष डॉ. जीवनसिंग राजपूत, महानगर मंत्री शैलेश पत्की यांनी केलं होतं.  ‘घरोघरी गुढी उभारून, जय श्रीराम नावाची रांगोळी काढावी. रात्री दिवे लावावेत. घरात बसून टीव्हीवर हा साेहळा पाहून उत्सवात आपण सहभागी व्हावे.’,  असं आवाहन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष देविचंदसिंह बारवाल यांनी केलं होतं.

First published:

Tags: Ayodhya ram mandir, Ram Mandir, Ram mandir and babri masjid