मुंबई, 2 सप्टेंबर : महाराष्ट्रामधल्या सत्तांतरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah in Mumbai) पहिल्यांदाच मुंबईमध्ये येणार आहेत. 4 आणि 5 सप्टेंबरला अमित शाह यांचा मुंबई दौरा आहे. मुंबईमध्ये अमित शाह लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत, याचसोबत भाजपच्या मिशन बीएमसीसंदर्भातही महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली आहे. ‘अमित शाह मुंबईत आल्यानंतर ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील. अमित शाह यांच्या विचारांचा आणि भेटीचा आम्हाला लाभ व्हावा म्हणून राजकीय बैठकाही होणार आहेत. राज्यातील महापालिका निवडणूक आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अमित शाह भाजपची रणनिती ठरवीतल. माझ्यासोबत तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत अमित शाह यांची बैठक होईल,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अमित शाह मुंबईत आल्यावर भेटायला जाणार का? मुख्यमंत्री क्षणभर थांबले मग म्हणाले… अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम 4 सप्टेंबरला रात्री अमित शाह मुंबईमध्ये येतील. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असेल. 5 तारखेला सकाळी 10 वाजता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जातील. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर 11 वाजता अमित शाह वांद्र्याला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचं दर्शन घेतील, त्यानंतर 12 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी अमित शाह बैठक घेणार आहेत, तसंच फडणवीसांच्या गणपतीचंही ते दर्शन घेतील. फडणवीसांच्या घरातील बैठक झाल्यानंतर अमित शाह दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गणपतीला जातील. 3 वाजता विद्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर शाह 5 वाजता दिल्लीला रवाना होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.