जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बाळासाहेब ठाकरेंबद्दल चंद्रकांतदादांचं ते वक्तव्य चुकीचं, भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

बाळासाहेब ठाकरेंबद्दल चंद्रकांतदादांचं ते वक्तव्य चुकीचं, भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

बाळासाहेब ठाकरेंबद्दल चंद्रकांतदादांचं ते वक्तव्य चुकीचं, भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

चंद्रकांत पाटील यांनी केलेलं बाबरी पाडण्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती हे वक्तव्य चुकीचं असल्याचं भाजपने म्हटलंय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव, 11 एप्रिल : चंद्रकांत पाटील यांनी केलेलं बाबरी पाडण्यात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका नव्हती हे वक्तव्य चुकीचं असल्याचं भाजपने म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीसह ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका केली जात होती. रामजन्मभूमीचं आंदोलन हा मोठा विचार होता. शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते असं म्हणणं चुकीचं.बाळासाहेब ठाकरेंचं या आंदोलनाला समर्थन होतं. कारसेवक वेगवेगळ्या राज्यांमधून आले होते असं बावनकुळे यांनी म्हटलं. तसंच चंद्रकांत पाटील यांची ती भूमिका व्यक्तिगत आहे. पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. कारसेवक म्हणून मी दोनदा अयोध्येला गेलो, पोलिसांचा मार खाल्ला : एकनाथ खडसे   चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं की, चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशिदी संदर्भात मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. जेव्हा रामजन्म भूमीचं आंदोलन सुरू होतं तेव्हा सर्व कारसेवक हे प्रभू रामाचं मंदिर बनलं पाहिजे या भूमिकेत होते तिथं पोहोचले होते. बाळासाहेब ठाकरे यांचं या आंदोलनाला समर्थन होत त्यामुळे बाळासाहेब ठाकरे, शिवसैनिक त्याठिकाणी नव्हते अस म्हणणं चुकीचं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बाबरी मशिदीबाबत बाळासाहेब ठाकरे यांचीही मोठी भूमिका होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांची ती व्यक्तिगत भूमिका आहे पक्षाची नाही. या विषयात पक्षाची भूमिका अशी आहे की रामजन्म भूमीच्या आंदोलनात असलेले कार सेवक हे वेगवेगळ्या पक्षांचे आणि वेगवेगळ्या राज्यांमधून आलेले होते असं बावनकुळे म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात