मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'फक्त आदरणीय पंकजाताई', परळीत बॅनर्सवरून भाजपचे सगळेच नेते गायब!

'फक्त आदरणीय पंकजाताई', परळीत बॅनर्सवरून भाजपचे सगळेच नेते गायब!

 या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही.

या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही.

या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही.

बीड, 25 जुलै : बीडच्या (beed) खासदार डॉ. प्रीतम मुंडे (pritam munde) यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात ( modi government cabinet reshuffle) आल्यामुळे बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या नाराजीचा उद्रेक झाला होता. आज पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे (pankaja munde banners) यांच्या वाढदिवसानिमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवरून भाजपचे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच सर्वच नेते गायब झाले आहे. त्यामुळे बीडमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा 26 जुलै रोजी म्हणजे उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने परळी शहरात ठिकठिकाणी पंकजा मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो पाहायला मिळत नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधील नाराजी पुन्हा एकदा उघड होताना दिसत आहे.

पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळत एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही.

भारतीय हवाई दलात दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी; 'या' जागांसाठी करा अर्ज

त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता या बॅनरवरुन नवे राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Parli