मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'भर सभेमध्ये धाड कशामुळे पडली ते सांगणार', रावसाहेब दानवेंचा अर्जुन खोतकरांना इशारा

'भर सभेमध्ये धाड कशामुळे पडली ते सांगणार', रावसाहेब दानवेंचा अर्जुन खोतकरांना इशारा

"आमच्या जुन्या मित्राला नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारही सापडले नाहीत. ते सध्या आमच्यावर आरोप करण्यात गुंतलेले आहेत. आपल्यासोबत काहीही घडलं ते रावसाहेब दानवेंनी केलं, असं ते म्हणतात", अशी टीका रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली.

"आमच्या जुन्या मित्राला नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारही सापडले नाहीत. ते सध्या आमच्यावर आरोप करण्यात गुंतलेले आहेत. आपल्यासोबत काहीही घडलं ते रावसाहेब दानवेंनी केलं, असं ते म्हणतात", अशी टीका रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली.

"आमच्या जुन्या मित्राला नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारही सापडले नाहीत. ते सध्या आमच्यावर आरोप करण्यात गुंतलेले आहेत. आपल्यासोबत काहीही घडलं ते रावसाहेब दानवेंनी केलं, असं ते म्हणतात", अशी टीका रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली.

पुढे वाचा ...

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 12 डिसेंबर : "मी एखाद्या सभेमध्ये धाडीचा खुलासा करेन. ही धाड कशामुळे पडली ते सांगेन. मग तुमची पोल खुलणार आहे", असा इशारा भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना दिला आहे. दानवे बदनापूर नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagarpanchayat election 2021) प्रचारासाठी आले होते. यावेळी भाषण करताना त्यांनी खोतकरांवर नाव न घेता निशाणा साधला. तसेच "मायचं दूध पिलं असणार तर माझ्यावर धाड टाकून दाखवा", अशा आव्हानाचा पुनरुच्चार त्यांनी केला.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

"आमच्या जुन्या मित्राला नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारही सापडले नाहीत. ते सध्या आमच्यावर आरोप करण्यात गुंतलेले आहेत. आपल्यासोबत काहीही घडलं ते रावसाहेब दानवेंनी केलं. मी निवडणुकीत पडलो, रावसाहेब दानवेमुळे पडलो. माझ्यावर धाड पडली, रावसाहेब दानवेमुळे पडली. काही लफडं केलं असेल तर पडली असेल. आमच्या काय बापाचं जातं? मी एखाद्या सभेमध्ये धाडीचा खुलासा करेन. ही धाड कशामुळे पडली ते सांगेन. मग तुमची पोल खुलणार आहे. अजून मी बोलत नाहीय. पण तुम्ही आमच्यावरही धाड टाका असं म्हणताय. मी याआधीच सांगितलंय. कुणी मायचं दूध पेल असेल तर रावसाहेब दानवेचा भ्रष्टाचार काढा. सापडतच नाहीत", असं रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : कल्याणमधील धक्कादायक घटना, घरात सापडला सेवानिवृत्त मोटरमनचा मृतदेह

'भाजपचे सारे उमेदवार निवडून येणार'

"त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी 16 कोटी आणले. तुम्ही किती आणले ते सांगा. त्यांनी तालुक्याचा विकास केला, तुम्ही काय केलं? एवढ्याच गोष्टीवर चर्चा करा. मी तुम्हाला सांगतो, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. भविष्य सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. कोणत्याही भविष्यकाराला विचारायची गरज नाही. भाजपचे सारे उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. इकडेतिकडे निवडणूक न ओढता ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर भाजप लढणार आहे", असंदेखील दानवे यावेळी म्हणाले.

हेही वाचा : 'गुजरातचा माणूस पंतप्रधान होऊ शकतो, मग तुम्हीही...' कोल्हेंची पवारांना विनंती

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना नेते आणि माजी खासदार अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर काही दिवसांपूर्वी ईडीने छापा टाकला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खोतकरांवर केलेल्या आरोपांनतर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. या सर्व कारवाईमागे रावसाहेब दानवे यांचा हात असल्याचा आरोप अर्जुन खोतकरांनी केला होता. तसेच दानवे यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केला असून तो आपण उघडकीस आणू, असा इशारा खोतकरांनी दिली होता. याच आरोपांवरुन दानवे यांनी पुन्हा एकदा खोतकरांवर निशाणा साधला.

First published:
top videos