सचिन जिरे, (प्रतिनिधी)
औरंगाबाद, 12 नोव्हेंबर: 'हे आधी दाऊद, हाजी मस्तान यांचा बाप काढायचे. आता माझा बाप काढला. राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो. माझा गॉडफादर दिल्लीत.' असं म्हणत भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.
आता आम्हाला कशाला पैसे मागता, 'तुमचं सरकार तुमची जबाबदारी', अशी घणाघाती टीका देखील रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दसरा मेळाव्यात रावसाहेब दानवे यांच्यावर खोचक टीका केली होती. या टीकेचा रावसाहेब दानवे यांनी वचपा काढला.
हेही वाचा...बिहारमध्ये चलबिचल! भाजपच्या विजयोत्सवानंतर नितीश कुमारांचं पहिलं मोठं वक्तव्य
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारकार्याच उद्घाटन करण्यासाठी रावसाहेब दानवे उपस्थित होते. यावे त्यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला. यावेळी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे याही उपस्थित होत्या.
नरेंद्र मोदी सारखी दुसरी मोठी शक्ती नाही, कारण अमेरिकेत ट्रम्प हरू शकतो, पण इकडे मोदी जिंकतात. कारण ही मोठी ताकत आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवे म्हणाले, गेल्यावर्षी पाऊस पडला. मुख्यमंत्री तिथे गेले आणि पंचनामे न करता मदत द्या म्हणू लागले. पण यावर्षी ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि घराबाहेर निघायलाच तयार नाही, लोक ओरडू लागले तर ते म्हणाले 'तुमचं कुटुंब तुमचं जबाबदारी'. अशा शब्दांत रावसाहेब दानवे यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली.
जर एखाद्या निवडणुकीत चार पाच कार्यकर्त्यानी तिकट मागितलं नाही तर समजून घ्या, त्या पक्षाचं काही खरं नाही. मुंगीला सांगावं लागत नाही साखर कुठे आहे, असाही टोला लगावला. आता या इलेक्शनमध्ये 'आमचा उमेदवार आमची जबाबदारी' आहे. सायलेंट वोटर भाजपला निवडून देत आहेत. शांत राहतात पण मतदान भाजपलाच करतात, असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
हेही वाचा..वक्फ बोर्डाच्या जमिनी आणि मालमत्तांबाबत उद्धव ठाकरे सरकारनं उचललं ठोस पाऊलकाय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या, मुंडे नावाला वलय आहे, काही लोक चर्चा करतात. पण मी त्याला घाबरत नाही. एखादा प्रश्न हातात घेतला तर तो तडीस नेण्याचा मी प्रयत्न करते. आपल्याला काहीही करायचं नाही, नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करायचं आहे.यावेळी निवडणुकीत समोरच्या उमेदवाराचे कर्मचारी प्रचाराला जातील. पण भाजपचे कार्यकर्ते प्रचार करणार आहेत, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. भाजप सरकारचे चांगले निर्णय रद्द करण्याचं काम हे सरकार करत आहे. आता त्यांना कोर्टाने चांगला चोप दिला आहे, अशी राज्य सरकारवर टीका केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.