Home /News /national /

भाजपच्या विजयोत्सवानंतर नितीश कुमारांचं पहिलं वक्तव्य; CM पदाचा दावा अद्याप केलेला नाही

भाजपच्या विजयोत्सवानंतर नितीश कुमारांचं पहिलं वक्तव्य; CM पदाचा दावा अद्याप केलेला नाही

नितीश कुमारांच्या वक्तव्याने बिहारमध्ये चलबिचल वाढली आहे. NDA ची मतं खाल्ल्यामुळे पासवान यांच्या LJP वर कारवाई करायची का, याचा निर्णय भाजपला घ्यावा लागेल, असंही मोठं विधान नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं आहे.

    पाटणा, 12 नोव्हेंबर : एकीकडे भारतीय जनता पक्षाचा (BJP in Bihar) बिहारच्या यशाबद्दल विजयोत्सव झाला असला तरी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा (Bihar CM) दावा केला नसल्याचं नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी स्पष्ट केलं आहे. जनता दल युनायटेड (JDU), भाजप यांनी NDA च्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने 125 जागांपर्यंत मजल मारली आणि बिहार विधानसभेत (Bihar Assembly election) स्पष्ट बहुमत मिळवलं. पण नितीश कुमार यांनी हा बाँब टाकल्याने बिहार पुन्हा अस्थिरतेकडे जातं का अशी शंका यायला लागली आहे. एकीकडे NDA मध्ये हे असं वातावरण असताना दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांनी महागठबंधनचंच सरकार बिहारमध्ये येणार असा दावा केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचा दावा केला नसल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री कोण हा निर्णय NDA घेईल. मुख्यमंत्रिपदासाठी माझा कुठलाही वैयक्तिक आग्रह नाही. आघाडीचा रालोआचा निर्णय आम्हाला मान्य असेल. नितीश कुमारांच्या JDU ला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाईल का, असं विचारल्यानंतर नितीश कुमार यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाआघाडीला 110 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यात राजदला सर्वाधिक 75 जागा, डाव्या पक्षांना 16 तर 70 जागा लढवून काँग्रेसला फक्त19 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसने चांगली कामगिरी केली असती तर महाआघाडीचं सरकार आलं असतं असंही म्हटलं जात आहे. नितीश कुमार यांनी काही घोटाळा करून आमच्या जागा कमी केल्या, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. टपालाने आलेल्या मतांच्या मोजणीत घोळ असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे पोस्टल बॅलेटची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. महागठबंधनची सत्ता थोडक्यात हुकली आहे. त्यामुळे देशातला सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचं तेजस्वी यादव (Tejashwi Yadav)यांचं स्वप्न भंगलं आहे. आता महाआघाडीत फुटीची शक्यता असून काँग्रेसला (Bihar Congress)हादरा बसण्याची शक्यता असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी अजुनही आपल्याला सत्ता स्थापनेची आशा असल्याचा दावा केला आहे. सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक गुरूवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी बोलताना तेजस्वी यादव यांनी हे संकेत देत आमदारांची आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Bihar Election, Nitish kumar

    पुढील बातम्या