मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जोडे मारले होते, आज नातू..., राम कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला

तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जोडे मारले होते, आज नातू..., राम कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलतान पुन्हा एकदा स्वातंंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.  यावरू आता राजकारण तापलं आहे.

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलतान पुन्हा एकदा स्वातंंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरू आता राजकारण तापलं आहे.

भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलतान पुन्हा एकदा स्वातंंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरू आता राजकारण तापलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई  17  नोव्हेंबर :  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी बोलतान पुन्हा एकदा स्वातंंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता राज्यात राजकारण तापलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाकडून काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत असलेल्या ठाकरे गटाला देखील याच मुद्द्यावरून भाजपकडून टार्गेट करण्यात येत आहे.  भाजपा नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हटलं राम कदाम यांनी? 

राम कदम यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. याचबरोबत त्यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. भारत जोडो यात्रा लोकांनी नाकारली आहे. म्हणून आता माध्यमांची जागा व्यापण्यासाठी सावरकरांबद्दल बोलले जात आहे. दु:ख याचे आहे की ज्या बाळासाहेबांनी सावरकारांचा अपमान करणाऱ्यांना जोडे मारले त्यांचेच नातू आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत, अशा शद्बात त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा :  'स्वातंत्र्य लढ्यात नसणाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलू नये', उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फटकारलं

फडणवीसांचा निशाणा 

दुसरीकडे बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधी आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला होता. काँग्रेस खोटं बोलत आहे, काँग्रेस कायमच सावरकरांबद्दल खोटं बोलत आलं आहे. राहुल गांधी यांना आता जनताच उत्तर देईल. ज्या बाळासाहेबांनी सावरकरांचा वारसा पुढे चालवला त्याच  बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे हे आज सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. असा घणाघात फडणवीस यांनी केला होता.

हेही वाचा :  Balasaheb Smrutidin : ‘उद्धव आणि आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर’…, शिंदे गटाकडून ठाकरेंवर प्रहार

नेमकं काय म्हटलं होतं राहुल गांधी यांनी? 

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सावरकर यांना आदंमानात बंद केल्यानंतर त्यांनी ब्रिटीशांना पत्र लिहिण्यास सुरुवात केली. जे लागेल ते घ्या पण माझी सुटका करा असं सावरकर यांनी म्हटलं होतं असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मात्र आता राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलं असून,  राज्यभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

First published:

Tags: Rahul gandhi