मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मलिक यांच्या चौकशीतून NIA ची कारवाई, लवकर मोठी नावं उघड होणार', भाजप नेत्याचा दावा

'मलिक यांच्या चौकशीतून NIA ची कारवाई, लवकर मोठी नावं उघड होणार', भाजप नेत्याचा दावा

  एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील'

एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील'

एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील'

रत्नागिरी, 09 मे :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Underworld Don Dawood Ibrahim)  स्लिपर सेल असलेल्या अनेक ठिकाणी 'एनआयएने (National Investigation Agency) मुंबई धाडी टाकल्यात. या प्रकरणामुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुचक विधान केलंय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik ik) यांच्या चौकशीतूनच एनआएने या पुढील कारवाया झाल्या आहेत. एनआयएच्या कारवायातून भविष्यात मुंबईत होणारे घातपात आणि पूर्वी झालेले घातपात त्यामधल्या मोठ्या नेत्याचे सहभाग लवकरच उघड होतील' असा दावा प्रसाद लाड (prasad laad) यांनी केला आहे.

लीलावती हॉस्पिटलमध्ये नवनीत राणा यांच्या एआरआय रिपोर्टमधल्या फोटोसंदर्भात जाब  विचारणाऱ्या माजी महापैर किशोरी पेडणेकर आणि मनिषा कायंदे यांना भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उत्तर दिलंय. 'चमचेगिरी किती करावी आणि किती वेळ करावी याला मर्यादा. हीच चौकशी कोरोना काळात केली असती तर महाराष्ट्राला ते आवडलं असतं. महापालिकेच्या दवाखान्यात किती भष्ट्राचार झाला हे जाहीर करावे आणि हे थोतांड बंद करावे असा सल्ला देखील प्रसाद लाड यांनी यावेळी दिला.

(नवरदेवाच्या कपड्यांवरून लग्नात राडा; अक्षता-फुलांच्या वर्षावाऐवजी झाली दगडफेक)

'सरकारी वकील प्रदीप घरत हे सरकारी वकील कमी आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून जास्त काम करतायत. त्यांची पंतप्रधानांबद्दल केलेली वक्तव्य खेदजनक होती. नवनीत राणा यांना विशिष्ठ विषयावर माध्यमांशी बोलू नये अशा सुचना न्यायालयाने दिल्या होत्या. सरकारमधील मंत्री नेते आणि सरकारी वकील यंत्रणा बनून राणा दाम्पत्यांला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो अशी भूमिका नवनीत राणा यांना कोर्टाने दिलेल्या नोटिसी संदर्भात प्रसाद लाड यांनी आपली भूमिका सष्ट केली.

हुंकार की खुंकार याचं उत्तर आम्ही मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून देवू. स्वतःच्या तोंडावरचा मास्क काढून जनतेत दाखवण्याचे धैर्य मुख्यमंत्र्यांनी दाखवावं. हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जनतेच्या समोर जावं लागतंय. हिंदुत्वाचा हुंकार आम्हाला दाखवू नये, अशी टीकाही प्रसाद लाड यांनी सेनेवर केली.

(कार्तिक-इशान नाही, सेहवागने T20 World Cup साठी केली या विकेट कीपरची निवड!)

नवनीत राणा यांच्या संसदेच्या विशेष अधिकार समितीसमोर सुनावणी होतेय. ज्या सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून सरकार वावरतंय. सुपारी घेवून मुंबई पोलिस आणि पोलीस आयुक्त वावरत आहे. नवनीत राणा यांनी संसदेचे अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली. संसदेचा अधिकाराचा वापर करून ही तक्रार केलीय. लवकरच सरकारला याचा जाब विचारला जाईल, अशी मला आशा असल्याचंही प्रसाद लाड म्हणाले.

First published:
top videos