मुंबई, 27 एप्रिल : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Nanveet Rana) यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला (Yusuf Lakadawala) याच्याकडून पैसे घेतल्याचे पुरावे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सादर केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी आता एक धक्कादायक ट्वीट केले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटमध्ये काय? मोहित कंबोज यांनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या युसूफ लकडावाला (Yusuf Lakadawala) याच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. तसेच Dawood Ibrahim के सभी गुर्गे एक साथ? असे कॅप्शन देत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना टॅग केले आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते? संजय राऊत म्हणाले, एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य अचानक राम भक्त झाले, हनुमान भक्त झाले. त्या भक्तीत इतके डुबले की, मुंबईत येऊन धिंगाणा करु लागले. मुंबईच वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू लागले. मातोश्रीला आव्हान द्यायचा प्रयत्न करत आहेत. आता तपासात लक्षात आलं की, राणा दाम्पत्य, भोंगे प्रकरण, हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचं.... जे काही सुरू आहे त्यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. जसं 1992च्या दंगलीमागे अंडरवर्ल्ड कनेक्शन होतं. गेल्या 15 दिवसांत जे काही घडत आहे, पुन्हा एकदा वादावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, मुंबईतील घडणाऱ्या घडामोडी यामागे नक्कीच डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करत आहे. हे वाचा - किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला समोर, 0.1 सेमीची जखम, कुठलीही गंभीर दुखापत नसल्याचं स्पष्ट डी गँगचा मुख्य फायनान्सर असलेल्या युसूफ लकडावाला याचा ईडीच्या कोठडीत मृत्यू झाला. त्या डी गँगचे आणि राणा दाम्पत्याचे आर्थिक हितसंबंध कसे आहेत याचं फक्त एक लहानसं प्रकरण समोर आलं आहे. याची चौकशी ईडीकडून का झाली नाही? जर लकडावालाने मनी लॉन्ड्रिंग केलं आहे आणि त्याचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला आहे, त्यातला एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहे. हे पैसे का घेतले? हा तपासाचा भाग आहे. पण आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, डी कनेक्शनशी संबंधित असलेल्याच्या कडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे झाला आणि फक्त इतकेच पैसे आहेत की आणि व्यवहार आहेत? याचा तपास ईओडब्ल्यू ने का नाही केला? कारण लकडावाला आधी ईओडब्ल्यूच्या कोठडीत होता मग ईडीच्या कोठडीत गेला. या सर्वांचा तपास होणं गरजेचं आहे. असंही राऊत म्हणाले.Dawood Ibrahim के सभी गुर्गे एक साथ ?@rautsanjay61 pic.twitter.com/NWXhsmijGz
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) April 27, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Dawood ibrahim, Sanjay raut