Home /News /mumbai /

किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला समोर, 0.1 सेमीची जखम, कुठलीही गंभीर दुखापत नसल्याचं स्पष्ट

किरीट सोमय्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आला समोर, 0.1 सेमीची जखम, कुठलीही गंभीर दुखापत नसल्याचं स्पष्ट

वैद्यकीय तपासणीचा अहवाला आला समोर, किरीट सोमय्यांच्या दुखापतीबाबत मोठी माहिती उघड

वैद्यकीय तपासणीचा अहवाला आला समोर, किरीट सोमय्यांच्या दुखापतीबाबत मोठी माहिती उघड

शनिवारी (23 एप्रिल) भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनच्या परिसरात हल्ला झाला. या हल्ल्यावेळी त्यांना दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं. याच संदर्भात किरीट सोमय्या यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आता समोर आला आहे.

    मुंबई, 27 एप्रिल : हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन झालेल्या संघर्षानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Amravati MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना शनिवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे खार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर तेथून परतत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली आणि त्यांना दुखापतही झाली. किरीट सोमय्या यांच्या हनुवटीजवळ रक्ताचे डागही दिसून आले. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा दावा सोमय्यांनी केला. तर शिवसेनेच्या नेत्यांनी सोमय्यांना झालेल्या दुखापतीवर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर आता सोमय्यांना झालेल्या दुखापतीच्या संदर्भातील वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. (Kirit Somaiya medical report reveals that there was no major injury) काय म्हटलं आहे वैद्यकीय अहवालात? किरीट सोमय्या यांची मुंबईतील भाभा रुग्णालयात करण्यात आली होती आणि याच वैद्यकीय चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे. या अहवालानुसार, किरीट सोमय्या यांना 0.1 सेमीची जखमी झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची सूज नव्हती. तसेच रक्तस्ररावही नव्हता, कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती असंही वैद्यकीच चाचणी अहवालात म्हटलं आहे. वाचा : डी-गँगकडून घेतलेल्या पैशांचा वापर राणांनी कुठे केला? राणा दाम्पत्याच्या मागे कोण? संजय राऊतांचा सवाल नेमकं काय घडलं होतं? किरीट सोमय्या 23 एप्रिल रोजी रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकल्याचे समोर आलं आहे. यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे. सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती. असा दावा शिवसैनिकांनी केला आहे. याआधीही पुण्यात किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता 5 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत पोहोचले होते. तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना अडवले. त्यावेळी सोमय्या आणि किरीट सोमय्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. विशेष म्हणजे. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. सुरक्षा रक्षकांनी मोठ्या शिताफीने सोमय्या यांना सुरक्षितपणे गाडीत बसवलं आणि तिथून बाहेर काढलं. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष प्रचंड शिगेला पोहोचलेला बघायला मिळाला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kirit Somaiya, Mumbai, Shiv sena

    पुढील बातम्या