Tips To Reduce Stress : ताण-तणावाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. सध्या आपल्या देशातील लोकांच्या तणावाची पातळी (Stress Level) खूप वाढली आहे, ज्यामध्ये केवळ प्रौढच नव्हे तर मुले देखील याला बळी पडत आहेत. सेंटर ऑफ हीलिंग (TCOH) च्या संशोधनानुसार, 74 टक्के भारतीयांनी तणावाविषयी चर्चा केली आहे. तर 88 टक्के लोकांनी एंग्जाइटीची चिंता व्यक्त केली. करिअर आणि परीक्षा हे भारतातील किशोरवयीन आणि मुलांच्या तणावाचे कारण आहेत. तर प्रौढांमध्ये खराब संबंध आणि नैराश्य हे कारण असल्याचे आढळले आहे. काही लोकांचा विश्वास आहे की, तणाव कमी (Reduce Stress) करण्यासाठी आपण घरातच उपाय करू शकतो. तर काहींना तसे वाटत नाही. या लेखात आपण घरगुती उपायांची माहिती घेऊ. चांगला आहार आणि व्यायाम करा तणाव टाळण्यासाठी आपली दिनचर्या बदला. चांगले आणि निरोगी अन्न खा आणि व्यायामाची सवय लावा. घरी फिरायला सुरुवात करा किंवा ऑनलाइन क्लास घ्या. यामुळे तुमच्या एंडोर्फिनची पातळी वाढेल आणि तणाव कमी होईल. यासोबतच ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. वेळेचे नियोजन तयार करा कोणाच्याही जीवनात वेळेचे नियोजन आवश्यक आहे. ताण कमी करण्यासाठी दिवसाचे एक वेळापत्रक बनवणे आणि त्याचे पालन करणे महत्वाचे आहे. हे आपल्याला कामात व्यग्र ठेवेल आणि नियम देखील पाळले जातील. हे वाचा - केसांच्या दुर्गंधीचा कंटाळ आलाय? हे 2 होममेड स्प्रे ठरतील तुमच्यासाठी उपयोगी ध्यानाचा सराव करा जर तुम्हाला तणावावर मात करायची असेल तर ध्यान करा. दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी घ्या आणि ध्यान करा. यासाठी सर्वकाही विसरून जा आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. आपण ध्यानासाठी ऑनलाईन व्हिडिओंची मदत देखील घेऊ शकता. काहीतरी नवीन करा तज्ञांच्या मते, तुम्ही ज्या कामात कुशल आहात त्याच्या मदतीने तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे लिहिण्याची कला असेल तर तुमच्या भावना लिहा किंवा चित्रकला करा. हे वाचा - धक्कादायक! दुसऱ्या लग्नासाठी बापानं 4 मुलींचा घेतला जीव; पत्नीच्या मृत्यूनंतर मेहुणीसोबत बांधायची होती लग्नगाठ स्पर्शिक अनुकरणात मदत मिळवा स्पर्शिक अनुकरण म्हणजेच स्पर्श उत्तेजनाची मदत घ्या. संशोधनानुसार, या पद्धतीद्वारे तणाव कमी केला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही काही वेळ अनवाणी चाला आणि अत्तर किंवा फुलांचा सुगंध घ्या. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.