जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात, आरोग्यसेवक गंभीर जखमी

भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात, आरोग्यसेवक गंभीर जखमी

भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या गाडीला अपघात, आरोग्यसेवक गंभीर जखमी

गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 27 सप्टेंबर: उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीला रविवारी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला पाचोरा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवानं गिरीश महाजन यांना काहीही झालेलं नाही. ते सुखरुप आहेत. पाचोरा तालुक्यातील लोहारा-वरखेडे रस्त्यावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. हेही वाचा… चीनमध्ये कोळशाच्या खाणीत 16 कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू मिळालेली माहिती अशी की, भाजपचे आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून जामनेर येथे आपल्या घराकडे येत होते. पाचोरा तालुक्यातील लोहारा–वरखेडे रस्त्यावर अचानक त्यांच्या वाहनाला मागून एका दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमीला मदत करण्यात कोणी पुढे येत नव्हतं. गिरीश महाजन यांनी स्वत: जखमी तरुणाला मदत केली. महाजन यांनी जखमी तरुणाला आपल्या गाडीत बसवून तात्काळ पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केलं. जखमी तरुणाची ओळख पटली असून बी.सी. पवार असं त्याचं नाव आहे. पवार हा आरोग्य कर्मचारी असून तो वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरीला आहे. हेही वाचा… खूशखबर! कोरोनावर 100% प्रभावी असा उपचार सापडला; शास्त्रज्ञांचा दावा दरम्यान, लोहारा–वरखेडी हा रास्ता प्रचंड खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांमुळे आमदार गिरीश महाजन यांचे वाहन हळू चालत होते. मात्र, रस्त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो आमदार महाजन यांच्या वाहनावर मागच्या बाजूनं आदळला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात