बीजिंग, 27 सप्टेंबर : दक्षिण-पश्चिम चीनमधील कोळशाच्या खाणीत रविवारी कार्बन मोनोऑक्साइडच्या पातळीत वाढ झाल्याने 16 जणांचा मृत्यू झाला. अधिकारी आणि माध्यमांनी ही माहिती दिली. चोंगकिंग नगरपालिका प्रशासनाने सोशल मीडियावर पोस्ट केले, की एकूण 17 लोक या खाणीत अडकले आहेत. एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, इतर 16 लोकांचे प्राण वाचवण्यात यश आलेले नाही आहे.
शिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बेल्ट जळाल्यामुळे कार्बन मोनोऑक्साइडची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती. हा कोणत्या प्रकारचा पट्टा आह, हे अद्याप कळू शकले नाही आहे. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की भूमिगत कोळसा खाणींमधून कोळसा काढण्यासाठी रबर पट्टा देखील वापरला जातो. जिल्हा प्रशासनाच्या वृत्तानुसार, किजियांग जिल्ह्यातील खाण स्थानिक ऊर्जा कंपनीशी संबंधित आहे.
(ही बातमी अपडेट होत आहे)