नागपूर, 23 डिसेंबर : '50 वर्षानंतरही मी मुख्यमंत्री म्हणून असेल,' असं उद्धव ठाकरे हे नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. या वक्तव्याचा आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. 'आपले मुख्यमंत्री आशावादी आहे, स्वप्न बघण्याची त्यांची सवय आहे. 50 वर्षानंतर मुख्यमंत्री पाहण्याचं स्वप्न बघितलं, स्वप्न बघायला पैसे लागत नाही,' अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
नागपूर येथे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. 'राज्यात गुंतवणूक येते आहे याचा आनंद आहे, मात्र यातील बरीचशी गुंतवणूक मागच्या काळातील आहे. आमच्या काळात गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. आता तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. पहिल्या क्रमांकावर गुजरात आणि दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'शिवसेना बदलत आहे...', नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
- संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही
- जैतापूरमध्ये मोबदला मिळाला म्हणून आता तो प्रकल्प होतो आहे, असं कळलं आहे. मोबदला कुणाला मिळाला हे बघावं लागेल.
- शिवसेना बदलत आहे ही चांगली बाब आहे
- प्रकल्पांना विरोध करत करण्याची शिवसेनेची भूमिका बदलत आहे
- याचप्रकारे नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे म्हणून विरोध केला
- लोकांना हा प्रकल्प हवा आहे
- स्थानिकांचा विरोध होतो म्हणून प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका शिवसेनेनं बदललेली पाहिजे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.