कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगामधून घेतलं स्वॅब, भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या

कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगामधून घेतलं स्वॅब, भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या

. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेतल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जुलै: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रुग्णांच्या चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, अमरावतीमधील बडनेरा येथे संतापजनक प्रकार घडला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या एका 24 वर्षीय तरुणीच्या गुप्तांगामधून स्वॅब घेतल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. यावरून आता राज्यातील राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी टेक्निशियनला अटक केली असून बलात्कारासह विविध कमलांद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा...महाराष्ट्राकडेही देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या बडनेरा येथे घटलेल्या प्रकाराबाबत चांगल्याच संतापल्या आहेत. असा प्रकार करण्याची त्या टेक्निशियनची हिंमत होते कशी ? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. राज्यात आज महिला सुरक्षा देवाच्या भरवशावर आहेत. क्वारंटाइन सेंटरमध्येही महिला सुरक्षित नाहीत, अशी सणसणीत टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. स्वॅब टेस्ट फक्त नाकाद्वारे घेतली जाते. याची सरकारने जनजागृती करावी, अशी मागणी देखील चित्रा वाघ यांनी केली आहे. कोरोनाच्या नावावर महिलांना काय काय प्रकार सहन करावे लागले असेल, हे सांगता येत नाही, अशी भीती वाघ यांनी व्यक्त केली आहे. दिशा कायद्याचं काय झालं ? असा सवाल देखील चिता वाघ यांनी यानिमित्तानं व्यक्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणी अमरावती येथे आपल्या भावाकडे राहते. येथील एका मॉलमध्ये ही तरुणी काम करते. काही दिवसांपूर्वी याच मॉलमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली. या पीडित तरुणीची 28 जुलै रोजी ट्रामा केअर सेंटरमध्ये स्वॅब घेण्यात आला. मात्र आरोपी अशोक देशमुखने रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून यरिन तपासणी करावी लागेल, असे तरुणीला सांगितले.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणी आपल्या एका महिला सहकाऱ्यासह तेथे पोहचली. त्यांनी महिला कर्मचारी नाही का? असे विचारले. त्यावर लॅब टेक्निशियनने महिला नसल्याचे सांगत स्वत: तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅब तपासणी केली. त्यानंतर टेक्निशियनने चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले. तरुणीला गुप्तांगातील स्वॅब टेस्टवर संशय आला, म्हणून तिने डॉक्टरांकडे याबाबत चौकशी केली. डॉक्टरांनी अशी कोणतीही चाचणी घेतली जात नसल्याचे सांगितले.

हेही वाचा...भारुडात करायचा 'स्त्री' भूमिका! चिडवायची मुलगी, 'कंचना' सिनेमा पाहून केली हत्या

तरुणीने भावासह अशोक देशमुख या तरुणाबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अशोक देशमुखला अटक केली. त्याच्यावर बलात्काराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 30, 2020, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading