• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'सरकारचा फ्यूज उडाला आहे', भाजप नेत्या चित्रा वाघ यांची बोचरी टीका

'सरकारचा फ्यूज उडाला आहे', भाजप नेत्या चित्रा वाघ यांची बोचरी टीका

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • Share this:
कल्याण, 31 जानेवारी : 'ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता नागरिकांनी वीजबिल भरलं नसल्याने सरकारने वीज कनेक्शन तोडण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सरकारचा फ्यूजच उडाला आहे,' असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासन पाळण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलेली आश्वासन फोल ठरली असून जनता सरकारला योग्य धडा शिकवणार असल्याचंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या वतीने कल्याणमधील आडिवली -ढोकळी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. हेही वाचा - महिला आमदार 10 वीच्या परीक्षेत नापास; अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी घेतलं होतं अ‍ॅडमिशन महिलांना बचतगटांमार्फत शासकीय योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं आहे. तर कुणाल पाटील यांनी बचत गटांच्या मोठ्या संख्येने नोंदण्या केल्या असून त्याचा फायदा घेण्याचं आवाहन चित्रा वाघ यांनी केलं आहे. तसंच कुणाल पाटील भविष्यात आमदार झाले तर आपल्याला आनंद होईल, असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला समाजसेवक अनिल पाटील, समाजसेविका  श्वेता पाटील यांसह महिला वर्ग सहभागी झाला होता.     'सर्वसामान्यसाठी आजपासून सुरू होणाऱ्या लोकल ट्रेनचा वेळ ऑड' मध्य रेल्वेवर आजपासून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी लोकलची सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र ही लोकल सेवा सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारची फायदेशीर नसल्याचे विधान चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये केले आहे. रेल्वे सुरू होण्याने नोकरदार वर्गाला फायदा होणार नाही, असं त्या म्हणाल्या.
Published by:Akshay Shitole
First published: