भोपाळ, 31 जानेवारी : एखाद्या नेत्याने राजकारण करीत असताना आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतल्याच्या घटना फारशा ऐकण्यात वा पाहण्यात येत नाही. काही महिन्यांपूर्वी एका बातमी समोर आली होती. पथरिया विधानसभामधील बसपाची आमदार रामबाई गोविंद सिंह परिहार या त्यांचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दहावीची परीक्षा देणार होत्या. मध्य प्रदेश राज्य ओपन बोर्डाचा दहावीचा निकाल समोर आला असून आमदार विज्ञान विषयात नापास झाल्या आहेत. त्यांनी शहरातील जेपीबी शाळेतून एक महिन्यापूर्वी 10 वीची परीक्षा दिली होती. शनिवारी निकाल लागला. त्यांच्या निकालानुसार त्या सर्व विषयात पास झाल्या आहेत, मात्र विज्ञान विषयात त्यांना अपयश मिळालं आहे. आता या निकालानंतर रामबाई यांना पुन्हा एकदा परीक्षेला बसावं लागणार आहे. त्यांना विज्ञान विषय पास करण्यासाठी सप्लीमेंट्री परीक्षा द्यावी लागणार आहे. शनिवारी सायंकाळी घोषित केलेल्या परीक्षेच्या निकालानुसार रामबाई परिहार विज्ञान विषयात नापास झाल्या आहेत. रामबाई या आठवी पास आहेत. हे ही वाचा- भीषण! बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घेतली 2000 कोटींची लाच; पैशांनी भरला होता Flat आपली शैक्षणिक माहिती त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या शपथपत्रात दिली होती. ते पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करू इच्छितात. यासाठी त्यांनी राज्याच्या ओपन बोर्डातून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षा पास करण्यासाठी त्यांना त्यांची मुलगी शिकवत होती. त्यांनी सांगितलं की, मुलीने मला शिकवलं आणि आत्मविश्वास वाढवला. यासंदर्भात पथरिया आमदार राम भाई यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, मात्र परीक्षा सेंटरच्या शिक्षकांनी सांगितलं की, रिझल्ट बाहेर आला आहे आणि रोल नंबरनुसार पास वा नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम बाई केवळ विज्ञान विषयात नापास झाल्या असून बाकी सर्व विषयात त्या पास झाल्या आहेत.
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.