शब्दांचा धार चढवा... कोणी चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा, BJP कार्यकर्त्यांना आदेश

शब्दांचा धार चढवा... कोणी चंपा, टरबुज्या म्हटलं तर पलटवार करा, BJP कार्यकर्त्यांना आदेश

राज्यावर कोरोनाचं संकट असताना सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै: राज्यावर कोरोनाचं संकट असताना सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यात भाजपने स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे आदेश देण्यात आले आहेत.

आगामी काळात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचं भान राखत आक्रमक पद्धतीनं कामे करावी. कोणी चंपा, टरबुज्या म्हटलं तर त्याला त्याच पद्धतीनं पलटवार करा, असे आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

हेही वाचा... वीज बिलांवरून मनसे गप्प राहील, असं समजू नका; राज यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

भादपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, कोरोनामध्ये लोकांना मदत करून राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. कोरोना काळातील भ्रष्टाचार उघड करावा लागेल, खूप मोठी राजकीय लढाऊ लढावी लागणार आहे. त्यामुळे शब्दांची धार वापरा, कोरोनाच्य परिस्थितीचं भान ठेवत आपल्याला आक्रमक राहायला हवं.

उद्धव ठाकरे सरकारवर आरोप...

सत्ताधाऱ्यांनी कोरोना काळात 'बॉडी बॅग'चा भ्रष्टाचार केला आहे. मृतांच्या टाळू वरील लोणी खाण्याचं काम केलं आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार असून तो आपल्याला उघड करावा लागणार आहे. ही खूप मोठी लढाई आहे. ती आपल्याला हा भ्रष्टातार उघड करायचा आहे. त्यासाठी सज्ज राहा, असंही चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजप कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, असा पवित्राच भाजपने घेतला आहे. यापुढे राज्यात निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एकेकाळी 25 वर्ष सोबत होता त्या शिवसेनेसोबत युतीची शक्यता मावळली आहे. त्यामुळे आगामी काळात जर राजकीय परिस्थिती बदलली तरी शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तसंच, मध्यंतरीच्या काळात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत गुप्त बैठक झाली होती. त्यानंतर अचानकपणे मनसेनं मेकओव्हर करत हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येतील अशी राजकीय चर्चा उघडपणे रंगली होती.

सोमवारी भाजप पक्षाच्या कार्यकारिणीला सुरुवात झाली होती. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्य भाजपला स्वबळावर सत्ता आणण्याचं आवाहन केलं होतं.

हेही वाचा... शरद पवारांनी दिला अजितदादांना महत्त्वाचा आदेश, आता...

'महाराष्ट्रात स्वार्थाकरता एकत्र येऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे हे सरकार आहे. या सरकारनं कोरोना परिस्थितीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. त्यांचे कारनामे हे लोकांसमोर आणले पाहिजे. मुळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या स्वार्था करता एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन केले आहे. येणाऱ्या काळात कुणाचाही मदत न घेता सत्तेत येण्यासाठी तयारी करा' असा आदेशच नड्डा यांनी कार्यकर्त्यांना दिला होता.

Published by: Sandip Parolekar
First published: July 28, 2020, 3:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या