Home /News /maharashtra /

मुख्यमंत्र्यांसारखा नेता स्वतःला 'मातोश्री'मध्ये कोंडून घेत असेल तर, भाजप नेत्याची घणाघाती टीका

मुख्यमंत्र्यांसारखा नेता स्वतःला 'मातोश्री'मध्ये कोंडून घेत असेल तर, भाजप नेत्याची घणाघाती टीका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या विरोधात 22 मे रोजी भाजप 'मेरा आंगण, मेरा रणांगण' राज्यभर आंदोलन करणार

    कोल्हापूर, 21 मे: राज्यावर कोरोना संकट आलं असताना त्यावर नियंत्रण मिळवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आलेलं नाही. ते सपशेल अपयशी ठरले आहेत. गेल्या दोन महिन्यापासून त्यांनी स्वतःला 'मातोश्री'मध्ये कोंडून घेतलं आहे. स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारच्या विरोधात 22 मे रोजी भाजप 'मेरा आंगण, मेरा रणांगण' राज्यभर आंदोलन करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. हेही वाचा...जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले 'हिच ती वेळ' मास्क घालून, हातात ग्लोज घाला, एवढंच नाही तर दुहेरी पीपीई किट घालून संकटाशी मुकाबला करण्यासाठी घराबाहेर पडा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. मुख्यमंत्री सारखा नेता स्वतःला कोंडून घेत असेल तर, सामान्यांचं काय? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मलाच पुण्याहून कोल्हापूरला यायला दोन दिवस लागले तर सर्वसामान्यांचं काय? असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सध्या महाराष्ट्र हे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत. राज्यातील कोरोना संकट निवरणामध्ये ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. संकटसमयी मुख्यमंत्र्यांनी खंबीरपणे उभे राहून जनतेला धीर द्यायला हवा होता. मात्र, त्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला मातोश्रीमध्ये कोंडून घेतलं आहे. आमदारांची, नगरसेवकांची बैठक मुख्यमंत्री का घेत नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना केला आहे. हेही वाचा.. 'नवरी नटली' फेम आणि प्रसिद्ध लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन असा करा राज्य सरकारचा निषेध.. राज्यातील ठाकरे सरकारविरोधात भाजप येत्या 22 मे रोजी "मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव" आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेने आपल्या घराबाहेर येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. आपल्या घराच्या अंगणात उभे राहून काळे मास्क, काळे शर्ट, काळी रीबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध करावा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसंच हातावर पोट असणाऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या