मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंच्या खास माणसाच्या घरी पोहोचले भाजपचे नेते आशिष शेलार, राजकीय चर्चांना उधाण

उद्धव ठाकरेंच्या खास माणसाच्या घरी पोहोचले भाजपचे नेते आशिष शेलार, राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच शेलार यांनी घरी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच शेलार यांनी घरी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच शेलार यांनी घरी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी करून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. या सत्तासंघर्षामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. अशा राजकीय तापलेल्या वातावरणात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खास असलेले मिलिंद नार्वेकर (milind narvekar) यांच्या घरी पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीयसहायक मिलींद नार्वेकर यांच्या वांद्रे येथील घरी मुंबई भाजपा अथ्यक्ष आशिष शेलार यांनी भेट दिली. नार्वेकर यांच्या घरी गणरायाची आगमन झाले आहे. त्यामुळे, गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नार्वेकर यांच्या घरी गणेश दर्शन घेण्यासाठी आलो असल्याचं, शेलार यांनी सांगितलं. शिवसेना भाजपमध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू असतानाच शेलार यांनी नार्वेकर यांच्या घरी भेट दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, मिलींद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास निकटवर्तीय माणले जातात. ज्यावेळी शिंदे गटाने सुरत गाठले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना परत बोलावण्याची जबाबदारी नार्वेकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यावेळी नार्वेकर हे सुरतला सुद्धा गेले होते.

('काय दारु...काय चकणा..समदं कसं ओके'; युवासेनेचा शहाजीबापूंना टोला, दिली मातोश्रीवर नोकरीची ऑफर)

काही दिवसांपूर्वी नार्वेकर यांना मातृशोक झाला. मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले. शिंदेगटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत यांनीही मिलिंद नार्वेकर यांचे सांत्वन केले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील पार्थिवाचे दर्शन घेऊन नार्वेकरांचे सांत्वन केलं होतं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नार्वेकरांची भेट घेतली होती.

First published:

Tags: Lokmat news