मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BJP Jal Akrosh Morcha: पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश, "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" चा मोर्चात नारा

BJP Jal Akrosh Morcha: पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश, "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" चा मोर्चात नारा

पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश, "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" चा मोर्चात नारा

पाण्यासाठी भाजपचा जालन्यात जलआक्रोश, "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" चा मोर्चात नारा

BJP Jal Akrosh Morcha: पाण्याच्या प्रश्नावरुन भाजपने जालन्यात जलआक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्टात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत.

जालना, 15 जून : औरंगाबाद प्रमाणेच जालन्यात देखील पाण्याची भीषण समस्या (water scarcity in Jalna) आहे. पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच पाणी प्रश्नावरुन भाजपच्या वतीने जल आक्रोश मोर्चाचे (BJP organised Jal Akrosh Morcha) आयोजन करण्यात आले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मोर्चामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रमुख उपस्थिती आहे. तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित असून या मोर्चात देवेंद्र फिरसे चा नारा पहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी परिधान केलेल्या टी शर्टवर माजी मुख्यमंत्री तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे छायाचित्र आहे. या टी शर्टवर मोठ्या अक्षरात "जनता बोले दिल से देवेंद्र फिरसे" (Janta Bole Dil Se Devendra Fir Se) असं लिहिलेलं आहे. ज्यामुळे जल आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल असा अप्रत्यक्ष संदेश तर देत नाहीये ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. वाचा : ढोलताशांच्या गजरात आदित्य ठाकरेंचं स्वागत, "अयोध्या रामराज्याची भूमी राजकारणाची नाही" जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. हनुमान घाट, लालबाग, कन्हैया नगर येथील महिला डफदड्याच्या तालावर आपल्या डोक्यावर पालथे मडके घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या. जालनाकरांना पाण्यासाठी तरसवणाऱ्या सरकारला या मडक्यासारखं पालथं करू, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. अनियमित पाणीपुरवठा, कृत्रिम पाणीटंचाई आणि अशुध्द पाण्यासोबत शहरातील इतर ही अनेक पायाभूत प्रश्नांसंदर्भात या मोर्चाच्या मध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. भाजपच्या वतीने शहरभर मोठं मोठाले बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. या मोर्चासाठी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. वाचा : Presidential Election 2022: राष्ट्रपती हवा असेल तर पवारांसारख्या नेत्यांचा विचार करावा लागेल - संजय राऊत औरंगाबाद येथील जल आक्रोश मोर्चाप्रमाणे जालन्यात या आंदोलनाला काही गालबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यात येतेय. मोर्चा मार्गावरील प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांनी बेरिकेट्स लावण्यात आले. शहरात एक अप्पर पोलीस अधीक्षकांसह 50 अधिकारी आणि 450 कर्मचारी बंदोबस्त कामी तैनात करण्यात आले असून शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आलं आहे. त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेत देखील अंशतः बदल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
First published:

Tags: BJP, Maharashtra News, Protest, Water crisis

पुढील बातम्या