Home /News /crime /

चाळीसगावात गावगुंडांचा हैदोस, प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण, तरुणाच्या डोक्यात फरशी घातली

चाळीसगावात गावगुंडांचा हैदोस, प्रेमी युगुलाला अमानुष मारहाण, तरुणाच्या डोक्यात फरशी घातली

गावगुंडांनी तरुणाच्या डोक्यात फरशी घातली. या गावगुंडांनी तरुणाचा मोबाईलही फोडला. या प्रकरणाचा व्हिडीओ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

जळगाव, 22 डिसेंबर : चाळीसगावमधून (Chalisgaon) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही गावगुंडांनी एका तरुण-तरुणीला अतिशय बेदम मारहाण (beating) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दहशत माजविण्यासाठी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये (Mobile) चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आला. गावगुंडांनी पीडित तरुणाला अतिशय अमानुषपणे बांबूने मारहाण केली. तसेच तरुणीलाही बेदम मारहाण केली. संबंधित प्रकार हा चाळीसगाव तालुक्यातील कन्नड (Kannad) घाटात झाल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण-तरुणी हे प्रेमसंबंधात आहेत. ते कन्नड घाटात फिरत असताना गावगुंडांनी त्यांना घेरलं. यावेळी त्यांनी त्या जोडप्याची विचारपूस करायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी दमादाटी केली. त्यानंतर या गावगुंडांनी जोडप्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ करायला सुरुवात केली. पीडित जोडपं एकटं असल्याचा फायदा घेत त्यांनी पीडित तरुण-तरुणीला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यातही कैद केला. त्यानंतर सोशल मीडियात संबंधित व्हिडीओ शेअर केले. गावगुंडांनी तरुणांच्या डोक्यात फरशी घातली विशेष म्हणजे गावगुंड एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तरुणाच्या डोक्यात फरशी घातली. या गावगुंडांनी तरुणाचा मोबाईलही फोडला. या प्रकरणाचा व्हिडीओ गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तसेच हे गावगुंड संबंधित परिसरात वारंवार दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरु आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. पण अद्याप हवी तशी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हेही वाचा : चक्क शौचालय गेले चोरीला? बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार पोलिसांची प्रतिक्रिया नेमकी काय? पोलिसांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे. पीडित तरुणाने या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे आरोपींवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांची भूमिका आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संबंधित व्हायरल व्हिडीओची पोलिसांनी दखल घेतल्याचं सांगितलं. तसेच पीडितांनी तक्रार केली नसली तरी व्हायरल व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं. "पीडित मुलगा समोरुन तक्रार देत नाहीय. पण एकंदरीत या मुला-मुलीच्या प्रेम प्रकरणाला काही जणांचा विरोध असल्याची गोपणीय माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. त्याच माहितीच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरु आहे", असं पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी सांगितलं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या