'यशोमती ठाकूर यांना मंत्रिपदावरून काढल्यास उद्धव ठाकरेंना सरकार पडण्याची भीती'

यशोमती ठाकूर या मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरू राहील

यशोमती ठाकूर या मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरू राहील

  • Share this:
अमरावती, 5 नोव्हेंबर: राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Congress Minister Yashomati Thakur) यांना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात शिक्षा झाली. यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, या मागणीवरून भाजप कार्यकर्ते (BJP Protest) चांगलेच आक्रमक झाले आहेत. यशोमती यांना मंत्रिपदावरून काढल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray)यांना सरकार पडण्याची भीती आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी तिवसा येथे आंदोलनादरम्यान लगावला. हेही वाचा...‘...तर राजकारण सोडून हिमालयात जाईन’, चंद्रकांत पाटील यांचं खुलं आव्हान VIDEO यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलनादरम्यान केली. यशोमती ठाकूर यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेईल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (गुरुवार) तिवसा येथे आहेत. यशोमती ठाकूर या मंत्रिपदाचा राजीनामा देत नाही, तोपर्यंत भाजपचं आंदोलन सुरू राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप येत्या काळात रस्त्यावर उतरेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना आठ वर्षे जुन्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यशोमती ठाकूर यांची शिक्षेविरुद्ध मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शिक्षेला नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. काय आहे प्रकरण? 24 मार्च 2012 रोजी अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाची हुज्जत घातल्या प्रकरणी यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस कॉन्सेटबलवर हात उगारल्याचाही आरोप होता. त्यावर गुरुवारी जिल्हा न्यायालायात सुनावणी पूर्ण झाली. न्या. उर्मिला जोशी यांनी यशोमती ठाकूर यांना प्रकरणात शिक्षा सुनावली. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. या प्रकरणाचा सविस्तर निकाल अद्याप हाती आलेला नाही. यशोमती ठाकूर यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. हेही वाचा...पुणे- सोलापूर महामार्गावर सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मराठी तरुणीसह तिघींची सुटका पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत घातली. सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण आदी कलमं यशोमती ठाकुरांवर लावण्यात आली होती. ठाकूर यांची जामिनावर सुटकाही झाली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: