कोल्हापूर 02 नोव्हेंबर: विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटल्यानेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे घाबरून कोल्हापूर सोडून पुण्यात आले अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली होती त्याला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलंय. पुण्यात कार्यकर्त्यांसमोर (Pune Bjp Meeting) बोलताना त्यांनी टीका करणाऱ्यांना खुलं आव्हानच दिलं. हिंम्मत असेल तर पोटनिवडणूक लावा जिंकलो नाही तर हिमालयात जाईल असंही ते म्हणाले.
पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश मला पक्षाने दिला. तुम्ही पुण्यातून निवडणूक लढवावी असं मला त्यावेळी अमित शहा यांनी सांगितलं होतं. त्यावर मी त्यांच्यासोबत बराच युक्तिवाद केला. कोल्हापूर सोडून गेलो तर चुकीचा संदेश जाईल असं मी म्हणालो. पण सगळा युक्तिवाद ऐकून झाल्यावर त्यांनी मला कोथरूडमधूनच निवडणूक लढण्याचा आदेश दिला.
पक्षाने आदेश दिल्यावर तो अंतिम असतो. त्यामुळे मी लढलो असंही पाटील यांनी सांगितलं. कोल्हापूर जिल्ह्यातून ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लढवावी, त्यात जिंकून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल असं आव्हानही त्यांनी दिलं.
अनेक वर्ष पक्ष संघटनेत काम केलेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत असलेले पाटील हे अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते.
पुणे- कोल्हापूर जिल्ह्यातून ज्यांना कुणाला वाटत असेल त्यांनी राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लढवावी, त्यात जिंकून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल - चंद्रकांत पाटील pic.twitter.com/Bhbo1aKQzm
— News18Lokmat (@News18lokmat) November 2, 2020
पाटील पुढे म्हणाले, पक्षाने आदेश दिला की तो ऐकावाच लागतो. माझ्यावर कितीही टीका झाली तरीही मी कधी उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नाही. मी पंतप्रधान मोदींकडून हे शिकलो आहे. कितीही टीका होवोत आपण आपलं काम करत राहायचं हे माझं तत्व आहे.