जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दादा, तुम्ही करून दाखवलंत! चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी, शिवसेनेला चिमटे

दादा, तुम्ही करून दाखवलंत! चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी, शिवसेनेला चिमटे

दादा, तुम्ही करून दाखवलंत! चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी, शिवसेनेला चिमटे

सिंधुदुर्गात चिपी विमातळावरून सुरू असलेला (BJP challenges Shivsena on the occasion of Chipi airport inauguration) जुना श्रेयवाद आता पुन्हा एकदा तोंड वर काढत असल्याचं चित्र आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिंधुदुर्ग, 7 ऑक्टोबर : सिंधुदुर्गात चिपी विमातळावरून सुरू असलेला (BJP challenges Shivsena on the occasion of Chipi airport inauguration) जुना श्रेयवाद आता पुन्हा एकदा तोंड वर काढत असल्याचं चित्र आहे. कोकणात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना (Rane vs Shivsena conflict) असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. भाजप नेत्यांच्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे. भाजपकडून पोस्टरबाजी चिपी विमानतळाचं उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीच श्रेयवादानं जोर धरला आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रत्यत्नातूनच साकार होत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असेल, तरी प्रत्यक्षात राणेंनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेली फळं हे वास्तव कोकणातील जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावा भाजपनं केला आहे. शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कुणाचाही तो घास नाही, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असं सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे. हे वाचा - असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, उत्खननात सापडलं ‘नवकोट नारायणा’चं शौचालय 9 ऑक्टोबरला उद्घाटन कोकणातील चिपी विमानतळाचं औपचारिक उद्घाटन केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या हस्ते 9 ऑक्टोबरला होणार आहे. त्यावेळी सिंदिया यांचा नारायण राणे यांच्या हस्ते भव्य सत्कार आयोजित केल्याची माहिती भाजपनं दिली आहे. विमानतळाच्या उद्घाटनाचं निमित्त साधत भाजप जोरदार शक्तीप्रदर्शन कऱण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकारनं नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिल्यानंतर महाराष्ट्रात राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचं भाकित अनेक राजकीय जाणाकारांनी व्यक्त केलं होतंच. आता चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं याची पुन्हा एकदा चुणूक पाहता येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात