जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हृदयद्रावक घटना, दुचाकीची पेट्रोल टाकी उघडताच लागली आग; पाहा, VIDEO पुढे काय घडलं

हृदयद्रावक घटना, दुचाकीची पेट्रोल टाकी उघडताच लागली आग; पाहा, VIDEO पुढे काय घडलं

हृदयद्रावक घटना, दुचाकीची पेट्रोल टाकी उघडताच लागली आग; पाहा, VIDEO पुढे काय घडलं

नालासोपारा (nalasopara) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. (video viral) मोटरसायकलला लागलेली छोटी आग (fire) विझवण्याच्या प्रयत्नात एक तरुण गंभीररित्या जळाला आहे. ही आग इतकी भीषण होती की, बाजूला उभी असलेली रिक्षादेखील जळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एपिल : नालासोपारा (nalasopara) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. (video viral) मोटरसायकलला लागलेली छोटी आग (fire) विझवण्याच्या प्रयत्नात एक तरुण गंभीररित्या जळाला आहे. ही आग इतकी भीषण होती की, बाजूला उभी असलेली रिक्षादेखील जळाली. ही घटना मंगळवारी नालासोपारा पश्चिमच्या हनुमान रोड येथे घडली.   माहितीनुसार, एक सीएनजी ऑटो आणि मोटरसायकलमध्ये धडक झाली होती. यानंतर लगेचच दुचाकीच्या टाकीत आग लागली. आश्चर्याची बाब म्हणजे टाकीला लागलेली छोटी आग विझवण्यासाठी पाईपच्या साह्याने मोटरसायकलवर पाणी मारले जात असताना या आगीने तीव्र रुप धारण केले.

जाहिरात

हेही वाचा -  Dhananjay Munde Health update: मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांनी दिली महत्त्वाची अपडेट

लोकांमध्ये एकच खळबळ -

लोकांच्या सांगण्यावरून तरुणाने आग विझवण्याचा प्रयत्न केला.  मात्र, तरुणाने टाकीचे झाकण उघडताच आग वेगाने भडकली. ही आग इतकी भीषण होती की अचानक तरुणही त्यात अडकला. या भीषण आगीत शेजारी उभा असलेला एक ऑटोही जळून खाक झाला. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली असून सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला.

तरुणाचा जीव वाचला -

दरम्यान, या आगीच्या दुर्घटनेत एक दिलासादायक बाब ही आहे की, यात तरुणाचा जीव वाचला आहे. तो किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आगीने तीव्र रुप कसे धारण केले होते, हे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात