मोठी बातमी! गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्यांना रहावे लागेल 14 दिवस क्वारंटाइन

मोठी बातमी! गणेशोत्सवाला कोकणात येणाऱ्यांना रहावे लागेल 14 दिवस क्वारंटाइन

कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांवरून शिवसेनाविरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे.

  • Share this:

रत्नागिरी, 23 जुलै: कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या मुंबईतील चाकरमान्यांवरून शिवसेनाविरुद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे. तर  दुसरीकडे, गणेशोत्सवाला येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे, असा मोठा निर्णय 25 गावांच्या सरपंच बैठकीत घेण्यात आला आहे. खारेपाटण येथे झालेल्या सरपंचांच्या बैठकीला राजापूरमधल्या 15 गावांचे तर सिंधुदुर्ग मधले 10 सरपंच उपस्थित होते. चाकरमान्यांनी 14 दिवसांच्या क्वारंटाईन पूर्ण केल्याशिवाय त्यांना बाजारपेठेत प्रवेश नाही, या निर्णयावरही सरपंचांनी ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसेच उशिरा येणाऱ्या चाकरमान्यांना दंड आकारण्यात येणार आहे.

हेही वाचा...चंद्रकांत पाटलांच्या नावानं 25 लाखांची खंडणी मागणाऱ्याच्या पुण्यात मुसक्या आवळल्या

दरम्यान, राज्य शासनाने कोकणातील चाकरमान्यांसाठी अजून कोणताही निर्णय केलेला नाही. त्यामुळेच कोकणात गणपतीला येणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील मोठा सण मानला जातो. या सणाला मोठ्या संख्येने मुंबई-पुण्याहून चाकरमाने आपापल्या गावी येत असतात. त्यामुळे चाकरमान्यांचे क्‍वारंटाइन 14 दिवसांचेच राहील. ज्या चाकरमान्यांना होम क्‍वारंटाईन करणे सुरक्षेच्या दृष्टीने शक्‍य असेल अशांचे होम क्‍वारंटाईन करावे, ज्या चाकरमान्यांचे होम क्‍वारंटाईन शक्‍य नसेल त्यांचे गावातच संस्थात्मक क्‍वारंटाइन करावे, अशा गावागावात निर्णय घेण्यात आला आहे.

..अन्यथा 1000 रुपये दंड...

गणेशोत्सवाबाबत कोकणातील काही गावांची चाकरमान्यांसाठी एक नियमावली तयार केली आहे. गणेशोत्सवासाठी 7 ऑगस्टपर्यंत या अन्यथा त्यानंतर आलेल्या चाकरमान्यांकडून 1000 रुपये दंड आकरण्यात येईल, असा निर्णय कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायतीने घेतला आहे. 7 ऑगस्टपर्यंत गावात या स्वागत करू, परंतु 7 ऑगस्ट नंतर आलात, तर दंड आकारू, असा ठराव डिगस ग्रामपंचायतीनं केला आहे.

हेही वाचा...पावसाळ्यात या कारणांनी मुलं आजारी पडतात; अशी घ्या काळजी

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने येणाऱ्या चाकरमान्यांना बांद्याजवळील रोणापाल गावात येणाऱ्यांना 7 ऑगस्टपूर्वी येण्याचे आवाहन ग्राम कृती दलाने केलं आहे. शासनाचे नियम बाजूला ठेवून स्थानिक ग्राम कृती दलाने घेतलेलेच निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील. असा एकमुखी निर्णय ग्राम कृती दल समिती व रोणापाल ग्रामस्थांनी घेतला.

Published by: Sandip Parolekar
First published: July 23, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading