मुंबई, 1 जुलै : कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 कलम लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत केवळ धार्मिक स्थळांना काही अटींसह सूट देण्यात आली आहे. कलम 144 चे आदेश जारी करण्याबरोबरच पोलीस आयुक्त प्रणय अशोक म्हणाले की, या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांचा विचार करता मुंबईत कलम 144 लागू केले जात असल्याचे पोलीस आयुक्त प्रणय अशोक यांनी आदेशात म्हटले आहे. अशा परिस्थितीत एकाच ठिकाणी लोकांच्या गर्दीवर बंदी असेल. ते म्हणाले की, विशिष्ट नियमांचे पालन करून धार्मिक स्थळांना सूट देण्यात आली आहे. हे वाचा- हे ‘भ्रमित ठाकरे’ सरकार, चंद्रकांत पाटलांची सडकून टीका
हे वाचा- बॉलिवूडच्या घराणेशाहीला या कलाकारांनी दिली टक्कर, गॉडफादर नसतानाही कमावलं नाव मुंबईत कोरोनाचे रुग्ण 77000 ओलांडले मंगळवारी महाराष्ट्रात कोविड -19 चे नवे 4878 रुग्ण आढळले आहेत. यासह, राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या वाढून 1,74,761 इतकी झाली आहे. याव्यतिरिक्त, कोरोना साथीच्या आजारामुळे 245 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात महामारीमुळे आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या 7855 वर गेली आहे. मुंबईतील रूग्णांची एकूण संख्या 77,658 पर्यंत पोहोचली आहे, तर येथे आतापर्यंत एकूण 4556 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपादन - मीनल गांगुर्डे