advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडच्या घराणेशाहीला या कलाकारांनी दिली टक्कर, गॉडफादर नसतानाही कमावलं नाव

बॉलिवूडच्या घराणेशाहीला या कलाकारांनी दिली टक्कर, गॉडफादर नसतानाही कमावलं नाव

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीचा वाद पुन्हा सुरू झाला आहे. मात्र काही कलाकार याला अपवाद आहेत.

01
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीचा वाद पुन्हा सुरू झाला आहे. पण बॉलिवूडमधील काही कलाकार मात्र याला अपवाद ठरले.  कोणीही गॉडफादर नसताना किंवा अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक सुपरहिट सिनेमे दिले.

02
अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे सध्या फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही यशस्वी ठरलेलं नावं आहे. 2003मध्ये तिनं अक्षय कुमारच्या 'अंदाज' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यावर मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत तिनं बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली.

03
बॉलिवूडमध्ये येण्याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मॉडेल म्हणून काम केलं होतं. किंग फिशर कॅलेंडरचा मॉडेल ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकल्यावर दीपिकाला बॉलिवूडमधून ऑफर येण्यास सुरुवात झाली आणि 2007मध्ये तिनं शाहरुख खान सोबत 'ओम शांति ओम' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. आज ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

04
1994मध्ये ऐश्वर्या रायनं मिस वर्ल्डचा मुकुट जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज ती बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसलेल्या ऐश्वर्यानं 'हम दिल दे चुके सनम', 'देवदास', 'गुरु' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

05
सुरुवातीला मॉडेलिंगमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या अनुष्का शर्मानं 'बँड बाजा बारात' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2017मध्ये अनुष्कानं क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केलं. आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये अनुष्काचं नाव घेतलं जातं.

06
बॉलिवूडची क्वीन मानली जाणारी कंगना रणौतला सुद्धा अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नाही. याशिवाय अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत असतेच. पण कंगना एक अशी अभिनेत्री आहे जी कोणत्याही अभिनेत्याशिवाय स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर सिनेमा हिट करू शकते.

07
सलमानला कतरिना कैफचा गॉडफादर म्हटलं जात असलं तरीही तिला अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नाही. एक ब्रिटीश मॉडेल म्हणून भारतात आलेल्या कतरिनाला बॉलिवूडमध्ये सुरुवातीच्या काळात बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. पण तरीही या सर्वांवर मात करत तिने बॉलिवूडमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत.

08
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं 14 जूनला आत्महत्या करत जीवन संपवलं पण सुशांत एक टॅलेंटेड अभिनेता होता हे कोणीच नाकारू शकत नाही. टीव्हीपासून सुरुवात केलेल्या सुशांतनं, बॉलिवूडमध्ये 'एम एस धोनी', 'छिछोरे' सारखे हिट सिनेमा दिले होते.

09
'स्टू़डंट ऑफ द इयर' या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रानं वयाच्या 18व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसणाऱ्या सिद्धार्थनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील आपलं स्थान पक्कं केलं. आज तो बॉलिवूडमधला एक लोकप्रिय अभिनेता आहे.

10
बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणाऱ्या जॉन अब्राहमनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. 1999 मध्ये 'Gladrags Manhunt'चा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यानं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.

11
आयुष्मान खुराना हे आजकाल सर्वाधिक चर्चेत असणार नाव. ज्या आयुष्मान खुरानाला धर्मा प्रॉडक्शननं करण जोहर फक्त स्टार किड्ससोबतच काम करतो असं सांगितलं होतं. त्या आयुष्माननं, 'बधाई हो', 'अंधाधुन', 'विकी डोनर' 'आर्टीकल 15' सारखे कमी बजेटचे सिनेमे हिट करत स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं.

  • FIRST PUBLISHED :
  • सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडच्या घराणेशाहीचा वाद पुन्हा सुरू झाला आहे. पण बॉलिवूडमधील काही कलाकार मात्र याला अपवाद ठरले.  कोणीही गॉडफादर नसताना किंवा अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि अनेक सुपरहिट सिनेमे दिले.

    MORE
    GALLERIES